घरताज्या घडामोडीराज्यपाल, केंद्रीय मंत्र्यांकडून जुहू चौपाटीवर स्वच्छता; 5 हजार किलो कचरा जमा

राज्यपाल, केंद्रीय मंत्र्यांकडून जुहू चौपाटीवर स्वच्छता; 5 हजार किलो कचरा जमा

Subscribe

१७ सप्टेंबर रोजीच्या सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष स्वच्छता अभियानाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, खासदार पूनम महाजन आदींनी जुहू चौपाटीवर एका दिवसांत समुद्रातून वाहून आलेला तब्बल ५ हजार किलो इतका कचरा गोळा केला.

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ५ जुलैपासून देशभरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ या मोहिमेचा मुंबई महापालिका क्षेत्रासाठीचा मुख्य सांगता समारंभ शनिवारी जुहू चौपाटी येथे पार पडला. (Cleaning of Juhu Chow patty by Governor Union Ministers 5 thousand kg of waste accumulated)

१७ सप्टेंबर रोजीच्या सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष स्वच्छता अभियानाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, खासदार पूनम महाजन आदींनी जुहू चौपाटीवर एका दिवसांत समुद्रातून वाहून आलेला तब्बल ५ हजार किलो इतका कचरा गोळा केला.

- Advertisement -

मुंबईत काही वर्षांपूर्वी १० हजार मेट्रिक टन इतका कचरा जमा करण्यात येत असे. मात्र पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे सदर कचऱ्याचे प्रमाण ६ मेट्रिक टनावर घसरला आहे. या तुलनेत आज एका दिवसांत फक्त जुहू चौपाटीवर समुद्रातून वाहून आलेला विविध प्रकारचा कचरा जमा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, खा. पूनम महाजन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक डॉ. व्ही. एस. पठानिया, महापालिका सह आयुक्त विजय बालमवार, घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, उपायुक्त भाग्यश्री कापसे पालिका वरिष्ठ अधिकारी, कामगार व कर्मचारी उपस्थित होते. तर गिरगाव चौपाटी येथे आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

- Advertisement -

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सागराचे आणि सागरी किनाऱ्याचे मानवी जीवनात असणारे महत्त्व आणि एकंदरीत पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. तर केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारतातील महत्त्वाच्या ७५ समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी ७५ दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेचा सांगता समारंभ हा मुंबई महानगरीतल्या जुहू चौपाटीवर आयोजित होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे आवर्जून नमूद केले.

महापालिका क्षेत्रातील स्वराज्यभूमी – गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.


हेही वाचा – मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -