घरमुंबईसफाई कर्मचारी करतात शवविच्छेदन; केईएममधला प्रकार

सफाई कर्मचारी करतात शवविच्छेदन; केईएममधला प्रकार

Subscribe

सुप्रीम कोर्टाने ही कर्मचारी शवविच्छेदन करणार नाहीत, अशी सक्त ताकीद हॉस्पिटल्सना दिली होती. पण, तरीही यावर पालिका प्रशासन लक्ष देत नाही आणि सफाई कर्मचारीच शवविच्छेदन करत आहेत.

परळसारख्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या केईएम हॉस्पिटलमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून रुग्ण उपचारांसाठी येतात. पण, सध्या केईएम हॉस्पिटलच्या शवगृहाची दुरावस्था झाली असल्याचं समोर येत असतानाच शवविच्छेदन हे डॉक्टर न करता सफाई कर्मचारी करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

शवगृहाची बिकट अवस्था

कोणत्याही हॉस्पिटलमधील शवविच्छेदनाचे काम आणि जबाबदारी ही प्रोफेशनल डॉक्टरांची असते. पण, तरीही केईएम हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी किंवा रोजंदारी कर्मचारी शवविच्छेदन करतात. या कर्मचाऱ्यांचं मुख्य काम हे हॉस्पिटलमध्ये सफाई करण्याचं आहे. त्यासोबतच, या शवागृहाची अवस्था देखील बिकट आहे. स्लॅब कोसळून एखादी दूर्घटना होऊ शकते अशी भीती इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

२०१२ पासून सफाई कर्मचारी शवविच्छेदन करतात. याविषयी सुप्रीम कोर्टाने ही कर्मचारी शवविच्छेदन करणार नाहीत, अशी सक्त ताकीद हॉस्पिटल्सना दिली होती. पण, तरीही यावर पालिका प्रशासन लक्ष देत नाही आणि सफाई कर्मचारीच शवविच्छेदन करत आहेत. २०१८ च्या ऑक्टोबरपासून केईएमच्या शवागृहात २१ बेवारस मृतदेह आहेत. यावरही वारंवार संबंधित पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करुनही अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ही ऐरणीवर आहे.

याविषयी मनसे युनियनचे उपाध्यक्ष दिलीप दळवी यांनी सांगितलं की, ” २०१२ पासून सफाई कर्मचारी हे शवविच्छेदन करतात हे प्रकरण सुरू आहे. शरीराचं विच्छेदन करण्यापासून ते शिवण्यापर्यंत हे काम चतुर्थ श्रेणी कर्मचारी करतात. शवविच्छेन कायद्यान्वये शरीरावर डॉक्टरांव्यतिरिक्त कोणीही धारदार साहित्याचा वापर करु शकत नाही. पण, कायदा धाब्यावर बसवून सर्रास कर्मचाऱ्यांकडून शवविच्छेदन करुन घेतले जाते. “

हॉस्पिटलवर निव्वळ आरोप

तसंच, एकूण सहा जागा रिक्त आहेत. त्याविरोधात २०१५ मध्ये केईएम प्रशासनाकडे शवविच्छेदन विभागातील निवृत्त कर्मचारी किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या वारसांना नोकरी द्या अशी मागणी केली होती. पण, अद्याप हॉस्पिटल प्रशासन या मागणी कडे दुर्लक्ष करत आहे. अगदी रोजंदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील तिथे नेमणूक करतात. अनेकदा सांगूनही यावर निर्णय घेतला गेला नाही. यावर अजून दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊ आणि हे थांबवलं नाही तर काम बंद करण्याचा इशारा देणार आहोत. ” तर, हा निव्वळ आरोप असल्याचं म्हणत केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी डॉक्टरच शवविच्छेदन करत असल्याचा दावा करतात.

” शवविच्छेदन म्हणजे मृतदेह उघडणं आणि बंद करणं नाही. शवविच्छेदन करताना संपूर्ण टीम तिकडे उपस्थित असते. फॉरेंन्सिक मेडिकलचे डॉक्टर्स आणि दुसरे पॅथॉलॉजिस्ट. त्यांना वॉर्ड बॉयही मदत करतात. हिस्टोपॅथॉलॉजी करताना डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करावं लागतं. सर्वच मृतदेहांचं शवविच्छेदन केलं जात नाही. ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी कसे बरे करतील. त्यामुळे हा निव्वळ आरोप आहे.” डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता , केईएम रुग्णालय

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -