घरताज्या घडामोडीप्रशासकीय हलगर्जीपणामुळे क्लिव्हलँड फ्लड गेट बदलीला ६ वर्षांचा विलंब

प्रशासकीय हलगर्जीपणामुळे क्लिव्हलँड फ्लड गेट बदलीला ६ वर्षांचा विलंब

Subscribe

फ्लड गेट ऐवजी रोलर गेट उभारण्यास २१ कोटींचा खर्च

वरळी, क्लिव्हलॅन्ड पंपिंग स्टेशन येथे समुद्र भरतीप्रसंगी समुद्राचे पाणी शहरात घुसू नये यासाठी वापरण्यात येणारे ब्रिटिश कालीन फ्लड गेट्स तांत्रिक कारणास्तव गेल्या ६ वर्षांपासून बिघडलेल्या अवस्थेत आहे. त्याची वेळीच दुरुस्ती अथवा ते बदली न केल्याने प्रभादेवी, दीपक टॉकीज, एलफिस्टन रोड, सेनापती बापट या भागात पूरप्रवण परिस्थिती निर्माण होऊन २९ ऑगस्ट २०१७ रोजी भर पावसात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा पाणी निचरा करण्यासाठी उघडण्यात आलेल्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली, असा गंभीर आरोप भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी आजच्या बैठकीत केला. (Cleanland flood gate replacement delayed by 6 years due to administrative negligence)

क्लिव्हलॅन्ड पंपिंग स्टेशन येथील फ्लड गेट बदलून त्याऐवजी २१ कोटी रुपये खर्चून ‘रोलर गेट’ बसविण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता भाजपतर्फे त्यावर जोरदार टीका करण्यात आली. मात्र सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम हाती घेण्यात आले असून पावसाळा वगळून ७ महिन्याचा कालावधी या कामासाठी लागणार असल्याने भाजपने या कामाचा चांगलाच समाचार घेत पालिका प्रशासनावर तोंडसुख घेतले.

- Advertisement -

यंदाचा पावसाळा तोंडावर आला असताना व हे काम लांबणार असल्याने यंदाच्या पावसाळ्यातही सदर कामाचा तसा उपयोगच होणार नाही, असेही भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. पालिका प्रशासनाकडून क्लिव्हलँड बंदर येथील फ्लड गेट्स बदलण्यास तब्बल सहा वर्षे उशीर झाल्यामुळे वर्ष २०१५ पासून समुद्राच्या भरतीच्या वेळी थोडासाही पाऊस पडल्यास भर पावसात समुद्राचे पाणी क्लिव्हलँड बंदर पातमुखातून शहरात शिरते. त्यामुळे प्रभादेवी, दीपक टॉकीज, एलफिस्टन रोड, सेनापती बापट या भागात पूरप्रवण परिस्थिती निर्माण होते, असे भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे.

हे फ्लड गेट निकामी झाल्यानंतरही तब्बल सहा वर्षे प्रशासनाने त्याबाबत दिरंगाई केली. वेळीच फ्लड गेट दुरुस्ती झाली असती तर डॉ. अमरापूरकर यांचा जीव वाचवता आला असता. याला केवळ निष्क्रिय महापालिका प्रशासन व उदासीन सत्ताधारी जबाबदार असल्याची टीका शिरसाट यांनी केली. सदर कामाचा फायदा तोंडावर असलेल्या यावर्षीच्या पावसाळ्यात होणार नाही. मग प्रशासन या पावसाळ्यात काय व्यवस्था करणार? असा प्रश्न प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination : लसीसाठी १० पुरवठादारांचा प्रतिसाद; कागदपत्रांअभावी प्रश्नचिन्ह

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -