घरमुंबईस्वच्छतेच्या नावावर क्लिनअप मार्शलकडून पैशांची 'लूट'...!

स्वच्छतेच्या नावावर क्लिनअप मार्शलकडून पैशांची ‘लूट’…!

Subscribe

स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा करून हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. पण या स्वच्छतेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार माय महानगरने समोर आणला आहे.

एकीकडे देशात ‘स्वच्छ भारत अभियाना’चा मोठा गाजावाजा करून स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं जात आहे. त्यातच आता स्वछतेच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई शहर स्वच्छ, सुंदर राहावे याकरता कंत्राटदारांना प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी पालिकेने दिली आहे. यामुळे शहरात कुठेही कचरा केल्यास दंड आकाराला जातं असून नियमानुसार २०० रुपये दंड वसूल केला जातं आहे. ज्यांच्याकडून दंड घेतला जातो त्याला त्याची पावती पण दिली जाते. मात्र पावती न देता २०० रूपयांच्या जागी मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे स्वछतेच्या नावाचे अक्षरशः धिंडवडे काढले जात असूम या प्रकाराचा खुलासा ‘माय महानगर’ने एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.

कंत्राचदार, कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार

मुंबई महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानाकाजवळील एक धक्कादायक प्रकार माय महानगरच्या प्रतिनिधीने कॅमेरात कैद केला आहे. महापालिकेच्या प्रत्येक वार्डात खाजगी कंत्राटदारांमार्फत क्लीनअप मार्शल अभियान चालवलं जात. यामध्ये एखाद्या ठिकाणी थुंकल्यास किंवा घाण केल्यास त्यांच्याकडून दंड वसूली केली जाते. पण हे खाजगी कंत्राटदार आणि त्यांचे कर्मचारी मिळून त्या प्रकारातही भ्रष्टाचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दंडाची रक्कम वाढवून घेतात

महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातून अनेक लोकं मुंबईत येतात. त्यांना बरेचदा हे नियम माहिती नसतात, त्यामुळे एखाद्या ठिकाणी थुंकणे किंवा कचरा फेकण्याचे प्रकार लोकांकडून झाल्यास नियमानुसार २०० रुपये वसूल केले जातील, असा नियम आहे. पण ५००, ७०० आणि १००० रुपयांपर्यंतचे पैसे लोकांकडूम उकळले जातात. या संदर्भात ज्यांच्याकडून ही मोठी रक्कम वसूल करण्यात आली असून पावतीही दिली गेली नाही, अश्या लोकांना ताबडतोब गाठून प्रश्न विचारले. प्रत्यक्ष घटनाच कॅमेरात कैद असल्यामुळे या क्लिनअप मार्शलच्या कर्मचारी आणि कंत्राटदारांना प्रश्न विचारले असता त्यांनी ही चूक मान्य केली.

दंडवसुलीसाठी २०१६ च्या पावत्या

२०१८ या चालू वर्षात दंड आकारण्यासाठी २०१६ या वर्षाची पावती वापरत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. या पावतीवर २०१६ हे साल लिहिलेलं असून त्यावर १०० रुपये दंड वसूल केला, असे लिहिण्यात आले आहे. मात्र तरीही १०० च्या जागी २०० रुपये वसूल केले जातात.

- Advertisement -

पैसे वसूलीची नोंदच नाही

क्लिनअप मार्शलच्या नावाखाली वसूल केलेल्या पैशांचं रेकॉर्ड ठेवलं जातं नसल्याचं सुद्धा निदर्शनास आले आहे. कारण एखाद्या माणसाकडून दंड वसूल केला तर त्याला पावतीच दिली जात नसल्याने हे पैसे रेकॉर्डवर येत नाहीत, तर ते त्यांच्या खिशात जातात.

‘माय महानगर’चे पाच प्रश्न

  1. स्वछतेच्या नावावर पैसे वसूल करणाऱ्या या कंत्राटदारांवर कोणाचा वचक आहे की नाही?
  2. जे पैसे हे वसूल करतात त्याच रेकॉर्ड ठेवले जातं का?
  3. २०१८ या चालू वर्षात महानगरपालिकेने २०१६ सालच्या पावत्या दिल्या असं कंत्राटदार दावा करतात ते खरं आहे का?
  4. पावतीवर १०० रुपये दंड वसूल केला असं लिहिलेलं असतानाही एवढी मोठी रक्कम का घेतली जाते?
  5. थुंकल्यावर दंड वसूल केला जाईल अस पावतीवर कुठेही लिहिलेलं नाही तरीही थुंकल्यावर दंड का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -