घरमुंबईस्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई; शिंदे- फडणवीस सरकारचा नारा

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई; शिंदे- फडणवीस सरकारचा नारा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई व निरोगी मुंबई, असे मुंबईचे सौदर्यीकरण होणार आहे. निरोगी मुंबई म्हणजे आपला दवाखाना असेल. शहरातील पादचारी व उड्डाण पुलाच्यांच्या खालच्या जागेचे सुशोभीकरण केले जाईल. तेथे रंगरंगोटी केली जाईल. रोषणाई केली जाईल. तेथे स्वच्छता केली जाईल. मुंबईकरांना पुलांच्या खालची जागा वापरता येईल, असे येथे सौदर्यीकरण केले जाईल

मुंबई: मुंबईचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबईच्या सौंदर्यीकरणावर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. उद्याच मुंबईतील १८७ सुशोभीकरणांच्या कामांचा शुभारंभ होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई व निरोगी मुंबई, असे मुंबईचे सौदर्यीकरण होणार आहे. निरोगी मुंबई म्हणजे आपला दवाखाना असेल. शहरातील पादचारी व उड्डाण पुलाच्यांच्या खालच्या जागेचे सुशोभीकरण केले जाईल. तेथे रंगरंगोटी केली जाईल. रोषणाई केली जाईल. तेथे स्वच्छता केली जाईल. मुंबईकरांना पुलांच्या खालची जागा वापरता येईल, असे येथे सौदर्यीकरण केले जाईल.

- Advertisement -

यासोबतच कोळीवाड्यांचे सौदर्यीकरण जाईल. तेथील संस्कृतीचे जतन केले जाईल. समुद्रकिनारे स्वच्छ केले जातील. मुंबईत शौचालये उभारले जातील. स्वच्छता दूत नेमले जातील. ईस्टन व वेस्टर्न एक्स्प्रसे वेवर महिला व नागरिकांसाठी अद्यावत शौचालये उभारले जातील, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होईल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सत्ता हाती घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आखणी सुरु केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारनेही मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी नियोजन सुरु केले आहे.

- Advertisement -

मुंबई खड्डेमुक्त करण्याचा वादा

आम्ही मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करु. रस्त्यांची दुरुस्ती करु, ब्लॅक टाॅपीक करुन सर्व रस्ते सुस्थितीत केले जातील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास हा नेहमीचाच आहे. नवीन येणारा प्रत्येक महापालिका आयुक्त खड्डेमुक्तीचे आश्वासन देत असतो. सिताराम कुंटे यांनी तर पालिका आयुक्त असताना उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन मुंबईतील रस्ते सपाट करणार असल्याचा दावा केला होता. कुंटे महाराष्ट्राचे सचिव म्हणून निवृत्त झाले. पण मुंबईतले रस्ते काही अजून सपाट झाले नाहीत. पावसाळ्यात तर मुंबईतील रस्त्यांची चाळण होते. यावर आता शिंदे-फडणवीस सरकारने तोडगा काढला आहे. त्यामुळे हे सरकार तरी मुंबईला खड्डेमुक्त करणार का, हे बघावे लागेल.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -