घरमुंबईउत्तर भारतीयांना धमकवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली - मुख्यमंत्री

उत्तर भारतीयांना धमकवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली – मुख्यमंत्री

Subscribe

एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन भूमिका मांडली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईत उत्तर भारतीयांच्या लोक महोत्सव २०१९ या कार्यक्रमात जाऊन उत्तर भारतीयांचं कौतुक केलं आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित होते.

‘मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना काहीजण धमकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आम्ही सत्तेत येऊन चार वर्षे झाली. या चार वर्षांत कुणाचीही उत्तर भारतीयांना धमकावण्याची हिंमत झाली नाही. कारण जे या उत्तर भारतीयांना धमकवत होते, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली’, अशी शेलक्या शब्दांतली टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचं प्रत्यक्ष नाव न घेता केली. गुरुवारी वाकोल्याच्या लायन्स क्लबमध्ये उत्तर भारतीयांच्या लोक महोत्सव या मंचावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुनावले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. यावेळी उत्तर भारतीय मंचावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर भारतीयांचे तोंडभरून कौतुक केले.

‘उत्तर भारतीय आता मुंबईकर झालेत’

आज उत्तर भारतीय मुंबईत आले आहेत. महाराष्ट्राच्या विकासात उत्तर भारतीयांची देखील महत्वाची भूमिका असून, हे उत्तर भारतीय आता उत्तर प्रदेशचे राहिले नसून, ते आता मुंबईकर आणि महाराष्ट्रवासीय झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उत्तर भारतीयांचे कौतुक केले.

- Advertisement -

काय म्हणालेत मुख्यमंत्री नेमकं?

‘योगींनी उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवलं आहे. मागील अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेश दिवस महाराष्ट्रात साजरा होत आहे. मात्र, पहिल्यांदाच मुंबईतील या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आहेत. तसेच पूर्ण देशात मराठी माणसाप्रमाणे उत्तर भारतीय देखील सापडतील. उत्तर भारतीय समाजाला धमकावण्याचा काही जण प्रयत्न करत होते. पण चार वर्षांत कुणाची या लोकांना धमकावण्याची हिंमत झालेली नाही’, असं मुख्यमंत्री यावेळी त्यांच्या भाषणात म्हणाले.

लोकमान्य टिळक आणि मदन मोहन मालवीय!

दरम्यान, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या पद्धतीने एकमेकांना अभिवादन केले. देवेंद्र फडणवीस यांनी योगींना लोकमान्य टिळकांची पगडी घातली, तर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्र्यांना मदन मोहन मालवीय यांची टोपी घालून अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -