घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा!

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा!

Subscribe

मुंबईत भाजपच्या झालेल्या विशेष कार्यसमिती बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईत भाजपने विशेष कार्यसमितीच्या बैठकीच्या निमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. मात्र, या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या नावाचीच जोरदार चर्चा घडवून आणल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीच्या ठिकाणी सगळीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह ‘मी पुन्हा येतोय’, असं सांगणारे फलक झळकले होते. त्यामुळे सरकारचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री हा ब्रॅण्ड पुन्हा एस्टॅब्लिश झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्यातच आता भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून खुद्द मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे संभावित मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रा काढत असतानाच आता स्वत: मुख्यमंत्रीच महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ‘पुन्हा मुख्यमंत्रीपदा’वरच शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न करत आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


हेही वाचा – मुंबईत भाजपची विशेष कार्यसमिती बैठक

येत्या १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असणार असल्याचं समजतंय.

अशी असेल मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

  • १ ऑगस्टपासून मोझरीतून यात्रेला सुरुवात
  • पहिला टप्पा – मोझरी ते नंदुरबार
  • दुसरा टप्पा – अकोले, अहमदनगर, नाशिक
  • २५ दिवस चालणार यात्रा
  • मुंबई वगळता ग्रामीण भागात यात्रा निघणार
  • ३० जिल्ह्यांतून यात्रा जाणार
  • यात १५२ विधानसभा क्षेत्रांचा समावेश
  • ४ हजार ५०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास
  • यात्रेदरम्यान ३०० हून अधिक सभा होणार
  • एकूण १०४ जाहीर सभा, २२८ स्वागत सभा आणि त्यादरम्यान रथावरूनच १० मिनिटांच्या मार्गदर्शन सभा.
  • काही मोठ्या विजय संकल्प सभांचाही समावेश
  • रथामधून यात्रा होणार असून यात व्यासपीठ, माईक, एलसीडी अशी अद्ययावत यंत्रणादेखील असेल
  • प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद होईल
  • नाशिक तीर्थ क्षेत्रावर या यात्रेचा समारोप होईल

आपली यात्रा ही प्रायव्हेट लिमिटेड असू नये. यात्रेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा सामान्य नागरिक किती असतील हे महत्त्वाचं. त्यासाठी यात्रेचं सूक्ष्म नियोजन करायला हवं. ही रथयात्रा नसून विकासयात्रा आहे. पण या यात्रेमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -