घरमुंबईआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

Subscribe

आज देवेंद्र फडणवीस यांनी चक्क भाजप प्रवक्ते अतुल शहा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. त्यामुळे छोटा कार्यक्रम का होईना, मुख्यमंत्री स्वतः हजेरी लावून विधानसभेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवत आहेत.

लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात भाजप-शिवसेनेच्या महायुतीला भरभरून यश मिळाल्यानंतर आता भाजप पक्ष विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागला आहे. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी चक्क भाजप प्रवक्ते अतुल शहा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. त्यामुळे छोटा कार्यक्रम का होईना, मुख्यमंत्री स्वतः हजेरी लावून विधानसभेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवत आहेत.

ज्या भागात कमी मते तिकडे जास्त भर

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपला कमी मते पडली त्या मतदार संघात भाजप जोर लावताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील ज्या मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जास्त मते मिळाली होती तेथील अतुल शहा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः हजेरी लावत मतदारांपर्यत पोहोचण्याचा अप्रत्यक्ष का होईना प्रयत्न केला. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जुन्या इमारतीचा निर्णय जेवढा आमच्या सरकारने घेतला तो कुणीच घेतला नाही. तसेच जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सरकार कठीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -