घरराजकारणगुजरात निवडणूक...म्हणून आम्ही सरकार बदलले, गुजरातच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

…म्हणून आम्ही सरकार बदलले, गुजरातच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Subscribe

गुजरातच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांनीच कौतुक केले. सत्ताधारी व विरोधकांनी मोदी यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची टीमही गेली होती. त्यामुळे या विजयासाठी त्यांचेही अभिनंदन करायला हवे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबई : आम्हीही महाराष्ट्रात भरपूर काम करतोय व त्यासाठीच सत्ता बदल केला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावर देताना दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमित शहा व गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांची जादू देश विदेशात आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गुजरातच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांनीच कौतुक केले. सत्ताधारी व विरोधकांनी मोदी यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची टीमही गेली होती. त्यामुळे या विजयासाठी त्यांचेही अभिनंदन करायला हवे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात गुजरातची पुनरावृत्ती होईल का?, या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्हीदेखील महाराष्ट्रात काम करतो आहोत. जनसेवेसाठीच आमचे सरकार स्थापन झाले आहे. त्याअंतर्गतच मुंबईचे सुशोभीकरण करण्याचे काम आमच्या सरकारने हाती घेतले आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. हे दुर्दैव आहे. आम्ही हे चित्र बदलू. त्यासाठीच आम्ही सुशोभीकरणाला प्राधान्य दिले आहे.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्त्व देशासह जगाने स्विकारली आहे. त्यामुळेच जी-२० चे यजमानपद भारताला मिळाले आहे. यानिमित्ताने मुंबई व महाराष्ट्राचे ब्रांडींग करता येईल. जगभरात भारताची मान उंचावणार आहे.

- Advertisement -

गुजरातच्या निकालामुळे महाराष्ट्रातही भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपने आखणी सुरु केली आहे. राज्य सरकारने केलेली कामे मुंबईकरांपर्यंत पोहोचवा, असे आदेशही उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिंदे गटाची भाजपला साथ राहणार आहेच. त्यामुळे ठाकरे गटानेही बांधणी सुरु केली आहे. शाखा प्रमुखांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत.  मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करताना, आम्हीही कामे करतोय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाक्य भविष्यातील महाराष्ट्रातील विजयाचे संकेत देणारे आहे, असे बोलले जात आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -