घर ताज्या घडामोडी दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

Subscribe

कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय विकास कामे योजना प्रकल्प यामध्ये सर्व सामान्यांच्या अशा आकांक्षा यांचा प्रतिबिंब बहुतेक यावर आमचा भर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेशी दिवाळीनिमित्त संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो अशी इच्छा व्यक्त केली. तसेच हे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आपले सरकार असून अनेक धोरणात्मक निर्णय या सरकारने घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि राज्याच्या विकासासाठी कोणकोणते निर्णय घेतले याचा पाढाच वाचला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधताना अनेक निर्णय घेतल्याची माहिती दिली. मु्ख्यमंत्री म्हणाले की, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे पाऊल टाकले. बाळासाहेब नेहमीच सांगायचे समाजकारण आणि राजकारण यात नेहमी समाजकारणाला प्राधान्य द्या. दिघे साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवलं आणि म्हणून शेतकरी कष्टकरी, कामगार, वंचित, शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.

- Advertisement -

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मी आणि उपमुख्यमंत्री त्यांनी ठामपणे सांगितलं आणि ठामपणे निर्णय घेतला. हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. हे सर्व सामान्य सरकार आहे. हे सगळ्यांसाठी असलेले सरकार असं वाटलं पाहिजे आणि सांगताना मला अत्यंत आनंद होतोय आमची वाट चाल देखील तीन-चार महिन्यांमध्ये अशीच सुरू आहे.

आपत्तीने कधी डगमगलो नाही

मुख्यमंत्री म्हणाले की, आपत्तीने आपण कधी डगमगलो नाही. त्यामुळेच काही चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि त्या यशस्वी देखील होत आहेत. अडचणी असतील पण आमचा हेतू स्पष्ट आणि मी संदेश आणि चांगला असाच आहे. लोकांच्या भल्या साठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठांना मोफत एसटी बस सेवा उपलब्ध केली. गेल्या 52 दिवसांमध्ये या योजनेचा एक कोटी पेक्षा अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला उदंड प्रतिसाद या योजनेला मिळतोय अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

दिवाळी गोड करण्यासाठी शिधा

- Advertisement -

दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी गोड होण्यासाठी पॅकेज आनंद शिधा केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टीने पूरग्रस्तांना एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टर एवजी तीन एकर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील निर्णय घेतला यामध्ये जवळपास तीस लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत मिळते. निकषात न बसणाऱ्या आणि सतत पावसामुळे नुकसान होणारे शेतकऱ्यांना देखील मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 755 कोटी रुपयांची त्यांना मदत करण्यात येणार आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची 950 कोटींच्या कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पन्नास हजार रुपय जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय, पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे. 20000 पोलीस शिपायांची पद भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विविध विभागातील 75 हजार पदांची भरती लवकर सुरू करण्याचे देखील प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांच्या घरांच्या किमती 50 लाखावरून पंधरा लाखावर आणल्या, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतलाय, आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचा देखील सरकार आमचा निर्णय घेताय, राज्यात सातशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आपण करतोय. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी या ठिकाणी सुरू आहे. यासाठी वाहतूक आणि औषध खर्चासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला.

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकर त्याचा शुभारंभ आपण करतोय. मुंबईच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कर्ज उभारण्यास आपण त्याला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये 337 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे होत आहे. वाहतूक कोंडी दूर होईल, लोकांना मोठा दिलासा मिळेल, राज्यात केंद्राच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यांमध्ये मित्रही संस्था स्थापन केली आहे. यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल. पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना देखील वेग देण्यासाठी मुख्यमंत्री वार रूम मधून त्याचे मॉनिटरिंग केले जाते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम एम आर मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांना वेग देण्याचा देखील निर्णय घेतला.

मुंबईला जवळपास 600 किलोमीटरचे रस्ते आपण काँक्रीट करण्याचा निर्णय घेतला त्याच्या निविदा प्रक्रिया देखील सुरू झालेल्या आहेत. त्याला साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंधरा हजार विद्यार्थ्यांना रोजगार संधी देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत एमओयू देखील आपण केलाय. राष्ट्रीय खेळाडूंच्या रकमेमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला यामुळे राज्यातले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचे नाव मोठं करतील. कुठलेही काम आम्ही थांबवलं नाही पडताळा ताळमेळ घेतल्यावर अनेक कामांना परवानगी तात्काळ दिली. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय विकास कामे योजना प्रकल्प यामध्ये सर्व सामान्यांच्या अशा आकांक्षा यांचा प्रतिबिंब बहुतेक यावर आमचा भर आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -