संतोष बांगर जरा शांत रहा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रेमळ सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तांतरानंतरचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात बांगर यांच्यामुळे काही गडबड होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगलीच खबरदारी घेतलेली दिसत आहे.

cm-eknath-shinde-warn-hingoli-mla-santosh-bangar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तांतरानंतरचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात बांगर यांच्यामुळे काही गडबड होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगलीच खबरदारी घेतलेली दिसत आहे.

आपल्या आक्रमक भूमिकेमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या कधी बेताल वक्तव्यामुळे तर कधी आक्रमकतेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली असल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. याचाच धडा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणताही राडा होऊ नये यासाठी दखल घेतलीय. यासाठी त्यांनी आमदार संतोष बांगर यांना जवळ घेऊन शांत राहण्याचा प्रेमळ सल्ला दिलाय.

संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी प्राचार्यांना तर कधी पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळे बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून संतोष बांगर यांच्या तोडफोडीच्या राजकारणामुळे सतत वादात अडकले आहेत. त्यामुळे संतोष बांगर यांचा भूतकाळ पाहता यंदा शिंदे-फडणवीस सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीही चूक होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना बजावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. तेव्हा शिंदे फडणवीस सरकारचे आमदार जोरजोरात घोषणाबाजी करत होते. यावेळी आमदार संतोष बंगारसुद्धा जोशात घोषणाबाजी करत होते. संतोष बांगर कधी कधी जोशमध्ये होश गमावून बसतात हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच कळलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून खाली उतरत होते. त्यावेळी संतोष बांगर यांचा जोश पाहून एकनाथ शिंदे यांनी त्यांना जवळ घेऊन जरा शांत रहा असं म्हणत कान टोचले. मुख्यत्र्यांनी दिलेला हा सल्ला शांतपणे ऐकून घेत संतोष बांगर यांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक छानसं स्मित हास्य देखील दिलं.