घरमुंबईCM Shinde यांचा झटका; संतोष कदमांचा पंधरवड्यातच ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'

CM Shinde यांचा झटका; संतोष कदमांचा पंधरवड्यातच ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणारे भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी अवघ्या पंधरा दिवसांत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा – आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल, मंगळवारी शिवसेना उपनेते तथा विभागप्रमुख यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत संतोष कदम आणि प्राची कदम यांनी पुन्हा शिवसेना प्रवेश केला. पंधरा दिवसांपूर्वी काही गैरसमजातून संतोष कदम यांनी तडकाफडकी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटाला भायखळ्यात सुरूंग लागल्याची चर्चा सुरू झाली होती. ही बाब यशवंत जाधव यांना कळताच त्यांनी फोन करून कदम यांच्याकडे हा निर्णय घेण्याचे कारण विचारले. कारण समजताच, संबंधित व्यक्तीला योग्य ती समज देऊन संतोष कदम आणि प्राची कदम यांच्या मनातली नाराजी दूर केली.

हेही वाचा – Ajit Pawar VS Vijay Wadettiwar सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत; वडेट्टीवारांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले…

- Advertisement -

आपण तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षात चुकीचा संदेश गेल्याचे लक्षात आल्यावर संतोष कदम आणि प्राची कदम यांनी काल, मंगळवारी यशवंत जाधव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा पुन्हा पक्षप्रवेश करून घेतले आणि झाले-गेले विसरून जात पुन्हा पक्षवाढीसाठी सक्रिय होण्यास त्यांना सांगितले. त्यामुळे शिवसेना सोडून गेलेला पदाधिकारी अवघ्या पंधरा दिवसांत ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करून पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल झाला आहे.

यावेळी संतोष कदम आणि प्राची कदम यांच्यासह रेहान खंडवानी, ज्योती पाटील, रेश्मा काळे, मानसी सकपाळ, प्रिया कदम, अमित खानविलकर, विजय पवार, चैतन्य पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा एक जोर का झटका दिल्याची चर्चा भायखळ्यात सुरू आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : विरोधी पक्षाने झोपेत पत्र लिहिलं का? विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेख नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -