Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लसीचे २ डोस घेतलेल्यांना लवकरच लोकल प्रवास? दरेकरांच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

लसीचे २ डोस घेतलेल्यांना लवकरच लोकल प्रवास? दरेकरांच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फोन करुन प्रवीण दरेकरांशी चर्चा

Related Story

- Advertisement -

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रवीण दरेकर यांच्याशी दुरध्वनीवर संवाद साधला आहे. यावेळी नागरिकांच्या लोकल प्रवासाबाबत सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्री सकारात्मक असून कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. यामुळे ज्या मुंबईकरांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांचा लोकल प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. उपनगरीय रेल्वे सेवा कर्जत-कसारा ते मुंबई- ठाणे लोकलसेवा सुरु करण्यात किती निकड आहे याचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसं त्यांना पत्रही दिले होते. मुख्यमंत्र्यांना सांगितले की कर्जत कसारा पासून मुंबईत यायला खासगी वाहनाने ६०० रुपये खर्च होत आहेत. तसेच रेल्वे नसेल तर वाहनानं येण्यासाठी ३ ते ४ तासाचा कालावधी लागतो. मध्यमवर्गीयांना हे परवडणारं नाही आहे यामुळे ज्या लोकांचे दोन लसीकरणाचे डोस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांकडे प्रामुख्याने मागणी केली आहे की, जे खासगी कंपन्यांमध्ये काम करत आहेत. अशा नागरिकांना कामावर न पोहचल्यामुळे काढून टाकण्यात येत आहे. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. आर्थिक स्थिती कमजोर झाली असल्यामुळे घरं, संसार कसा करणार यामुळे अशा नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी फोनवरही केली असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून ज्या नागरिकांचे दोन डोस झाले आहेत अशा नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरेकरांची पत्राद्वारे मागणी

- Advertisement -

१) कर्जत, कसारा पासून ते मुंबईपर्यंत, डहाणू पासून ते मुंबईपर्यंत, पनवेल पासून ते मुंबईपर्यंत ज्या नागरीकांचे संपुर्ण लसीकरण झाले आहेत (ज्यांचे लसीचे दौन्ही डोस झाले आहेत) अशा सर्वसामान्य नागरीकांना प्रवासाची मुभा देण्यात यावी.

२) सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल मधून वाहतूक करण्याची अनुमती आहे त्याचप्रमाणे जे खासगी कर्मचारी आहेत ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहे त्यांनाही लोकल मधून वाहतुकीची अनुमती मिळावी

- Advertisement -