घरमुंबईनिष्क्रिय कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांना पुरस्कार द्यायला हवा - चंद्रकांत पाटील

निष्क्रिय कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांना पुरस्कार द्यायला हवा – चंद्रकांत पाटील

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट

देशात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती परंतु गेल्या काही महिन्यांपासून देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. हे अतिशय धक्कादायक असून कोरोना परिस्थितीवरील निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा घातक असून याची बाधा लवकर होत आहे. राज्यात वर्षाच्या सुरुवातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आले होते. परंतु लॉकडाऊनमध्ये दिलेल्या शिथिलतेमुळे पुन्हा राज्यात कोरोनाच्या विस्फोट होताना दिसत आहे. सध्या राज्यात २,५२,३६४ पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर देशात सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण असणारे हॉटस्पॉट जिल्हे महाराष्ट्रात आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या जल्ह्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांना आटोक्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. राज्य शासनाच्या निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -