घरमुंबईलोकल खुली करण्याचे विचाराधीन , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

लोकल खुली करण्याचे विचाराधीन , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

Subscribe

मुंबई महापालिकेच्या खार एच कार्यालयाचे उद्घाटन, जबाबदारीचे भान ठेवूनच लोकलचा निर्णय

मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी मुंबईसह आसपासच्या शहरातील कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन आणि जबाबदारीचे भान ठेवूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मुंबईतील लोकलसंदर्भात भाष्य केले.तसेच निर्बंध शिथिल न झालेल्या जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी नियम तोडू नयेत. संयम सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता दिली असताना राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजून खुली केलेली नाही. सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधी मिळणार, अशी विचारणा होत असताना खुद्द ठाकरे यांनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आजच मुंबईतील लोकल ट्रेनबाबत केंद्राची भूमिका मांडली आहे. ‘लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. कोरोनाची स्थिती राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची विनंती केल्यास आम्ही तत्काळ त्यावर निर्णय घेऊ,’ असे दानवे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे गुरुवारचे विधान महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

राज्यातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी परिस्थिती असल्याने तेथे निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचेच बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार असे विचारले जात आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचे भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असेही ते म्हणाले.

जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापार्‍यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असे काही नाही. सरकारला सर्व नागरिकांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पालिका कर्मचारी होते म्हणून आपण आहोत. पालिका कर्मचार्‍यांनाही जीव आहे. त्यांनाही कुटुंब आहे. पण तरीही कठीण काळात पालिकेने जे काम केले ते अद्वितीय आहे. आपण आपले मुंबई मॉडेलही तयार केले आणि त्याची जगानेही दखल घेतली. आजही कोरोनावर उपचार नाही. पण धाडसाने मॉडेल तयार केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कोरोनाचे संकट असतानाच मुंबईवर नैसर्गिक आपत्ती येत आहे. प्रचंड पाऊस आणि दरडीही कोसळत आहेत. जगभरात पूर येत आहे. बिजिंगची महापालिका आपल्या ताब्यात नाही. देशभरात जिथे जिथे पूर आले असतील त्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीत. पण तिथेही पूर आला. त्याला जबाबदार कोण? तिकडचे लोक कदाचित बोलत असतील, असे सांगत ठाकरे विरोधकांना चिमटा काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -