घरताज्या घडामोडीकरोना इम्पॅक्ट : मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बंद खोलीऐवजी मोकळ्या आवारात!

करोना इम्पॅक्ट : मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बंद खोलीऐवजी मोकळ्या आवारात!

Subscribe

वर्षा बंगल्यावर बैठकीच्या बंद खोलीमध्ये करोनाबाबतची पत्रकार परिषद न घेता मुख्यमंत्र्यांनी थेट बाहेरच्या आवारात घेण्याचा निर्णय घेतला.

राज्यासह देशात सध्या करोनाचे संकट उभे राहिले असून, राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या आता ३९ वर पोहोचली आहे. आनावश्यक गर्दी टाळणे, हात स्वच्छ धुणे, हस्तांदोलन न करता हात जोडणे असे अनेक उपाय राज्य सरकारने सुचवले आहेत. राजकीय नेते देखील सध्या याचे अनुकरण करताना पहायला मिळत आहेत. सध्या राजकीय नेते कार्यकर्त्यांना भेटताना देखील सुरक्षित अंतर ठेवूनच असतात. एवढंच नाही, तर लांबूनच हात जोडणे पसंत करतात. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सध्या जास्त गर्दी टाळताना दिसत आहेत. म्हणूनच की काय त्यांनी आज संध्याकाळी बैठकीनंतर पत्रकार परिषद ही बंद खोलीत घेण्याऐवजी वर्षा बंगल्यातील बाहेरच्या आवरात घेणे पसंत केले.

बैठकीचं स्थान बदललं?

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ही जिथे बैठक पार पडली त्या ठिकाणी होईल असे सांगण्यात येत होते. सर्व पत्रकारांना देखील बैठक संपल्यानंतर तिथेच पाठवण्यात आले. मात्र, अचानक पत्रकार परिषद बाहेर घेण्यात येईल असा मेसेज आला. त्यामुळे बंद खोलीतील गर्दी टाळण्यासाठी आणि करोनाच्या भीतीमुळे तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद मोकळ्या जागेत घेतली नाही ना? अशी चर्चा सुरू झाली.

- Advertisement -

दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात वेगाने वाढतो करोना!

दरम्यान, ‘सोमवारी वर्षावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पुढचे दोन आठवडे महत्वाचे असल्याचे सांगत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच पहिल्या २ आठवड्यांमध्ये संथ वाढ झाली, पण तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात करोनाची खूप वेगाने वाढ होते. राज्यात करोनाची आणखी वाढ होण्याआधी आपण त्याला परतवून लावू शकतो. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आपण केल्या आहेत. आज दुपारी मी, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी मिळून राज्यभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. रेल्वे, एसटी, बसच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. काय करावं आणि काय करू नये यासाठीचं एक डिझाईन त्यांना दिलं जाईल. या सूचना रंगवलेली ट्रेन लवकरच सुरू केली जाईल’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


वाचा सविस्तर – CoronaVirus : पुढचे २ आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे-मुख्यमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -