घरताज्या घडामोडीचाचणी अहवाल व बेड तातडीने द्या, मुंबईच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

चाचणी अहवाल व बेड तातडीने द्या, मुंबईच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Subscribe

ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा. या माध्यमातून रुग्णांना आवश्यक सुविधा देऊन हे संकट दूर सारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करणे, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड १९ संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन बैठकीत घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर कोरोनाचे निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल. त्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच बाधित रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त रुग्णशय्यांच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा. या माध्यमातून रुग्णांना आवश्यक सुविधा देऊन हे संकट दूर सारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुंबईमध्ये साधारणत: १० फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणे नसलेले बाधित रुग्ण आहेत असे सांगितले. मुंबईत एकूण १५३ कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० रुग्णशय्या आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल. १० फेब्रुवारी २०२१ पासून आजमितीपर्यंत १०५० आयसीयू रुग्णशय्या नव्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता ८ ते १० हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील १० हजाराच्या घरात आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज ३ हजार ९०० रुग्णशय्या रिक्त/उपलब्ध आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी निरनिराळ्या हॉटेल्स संलग्न करुन देण्यात येत आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मागील आठवड्यात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये ३५० रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यासोबत प्राणवायू पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी महानगरपालिकेकडून ६ समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आले आहेत. तर मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करुन देवू शकतील. मुंबईतील ६४ नर्सिंग होममध्ये प्राणवायूचा सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेची धडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २५ लाखांची दंडवसुली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -