तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार ? – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray criticizes BJP
Aditya Thackeray criticizes BJP

मोदींनी अन्नधान्य दिले पण शिजवणार कसे, घर पेटवता येते पण चूल कशी पेटवणार

उज्वला योजनेचे बारा वाजले आहेत

बुलेट ट्रेन कारशेडसाठी केद्रात जाऊ बोंबला

मुंबईत मराठी माणसाची अडवणूक  केंद्रातून  केली जात आहे

मुंबई स्वतंत्र्य तुमच्या जन्मात होणार नाही

तो मुन्नांभाई लोकांचे भले करत फिरायचा, हा मुन्नांभाई नुसता फिरतोय

काहीजन मुन्नाभाईसारखे भगवी शाल अंगावर घेऊन फिरत आहेत फिरूद्या

लगे रहो मुनाभाई सारखी एक केस आहे आपल्या कडे,
ज्याला बाळासाहेब ठाकेर झाल्यासारखे वाटते

यांचे एक एक घोटाळे बाहेर येत आहेत

महाराष्ट्राला बदनाम करायची मोहीम सुरू आहे

गुंतवणूक आणि इतर क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

ही भानगडी करणारी मानस स्वत:ला हनुमान पूत्र कसे म्हणाता

ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला

भाजपचे लोक मनोरुग्ण

तूमच्या वजनाने बाबरी पडली असती

तूम्ही काय सहलीला अयोध्येला गेला होता काय?

भोंगे  प्रकरण नितीश यांनी चालू दिले नाही

काँग्रेसमध्ये गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडले नाही

काँग्रेसमध्ये गेलो उघड गेलो, तुमच्या सारखा सकाळचा शपथ विधी नाही केला

तीथे काश्मीरी पंडीताना सुरक्षा नाही आणि तुम्ही इथल्या तीनपाटाना सुरक्षा देताय – उद्धव ठाकरे

म्हाळगीतून शिकलेले गेले कुठे, हे तुमचे प्रॉडक्ट आहे

ही बाळासाहेंबाची शिवसेना नाही म्हणता मग तुमचा पक्ष कुठे अटलजींचा राहीला आहे

आमची युतीमध्ये 25 वर्ष सडली.. हो  ती सडलीच

हे जीएसटी वेळेत देत नाहीत आणि पेट्रोल डिझेलचे दर कमी करा म्हणाले

महागाईच्या मुद्द्यावर कुणी बोलत नाही

संयुक्त महाराष्ट्र समीतीतून पहील्यांदा जनसंघ तूटला

मुंबईचा लचका जो तोडेल त्याचे शिवसेना तुकडे तुकडे करेल

गाढवाने लाथ मारण्या आधीच आम्ही त्याला सोडले


महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्यभर जात होते. राज्यतल्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केली. कोविड काळात जे काम महाराष्ट्राने केले त्याचे कौतुक महाराष्ट्र किंवा देशाने नाही तर जगाने केले त्याचा अभिमान आपल्याला असायला हवा. तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार ? असे अदित्य ठाकरे म्हणाले.

2020 चा काळात ८ मार्च रोजी अजित पवार यांनी बजेट सादर केलं. शेतकरी कर्जमाफीनंतरचं हे बजेट होतं. त्यानंतर कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि 15 दिवसात हॉस्पिटल उभं करण्याचे आदेश दिले. आपला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं होता. केंद्रानं अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केला.

मुख्यमंत्री लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन येऊन लोकांना मार्गदर्शन करायचे तेव्हा लोकांना वाटायचं हा कुणी मुख्यमंत्री नाही तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती बोलतोय. असा मुख्यमंत्री असायला हवा. आपण कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न दाखवून दिला. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री असतात. त्याचा आम्हाला एक शिवसैनिक म्हणून कौतुक आणि अभिमान आहे.

कोरोना काळातही आपला विकास थांबला नाही. उलट महाविकास आघाडीने शाश्वत विकास दिला. मेट्रोची कामं, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मुंबई नागपूर हायवे अशी अनेक कामं सुरु होती आणि आहेत. अर्थचक्र सुरु ठेवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर होतं. पण तरीही आपण विकासकामं थांबवली नाहीत.

बीएमसीची कामं, महाराष्ट्र सरकारची कामं अनेक आहेत. जेव्हा आपल्या राज्यात देशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महागाई, बेरोजगारी, समाजात, माणसात भांडण लावलं जातं, अनेकांनी वेगवेगळे रंग हातात धरले आहेत. अशावेळी तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार आहात की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार आहात? हे ठरवायला हवं.

—————————————————————————————————

शिवसेनेचे हिदूत्व छत्रपती संभाजी राजांसारखे,

शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंचावर दाखल

शिवसेना कोणा समोर वाकनार नाही – संजय राऊत

तुम्ही कोणती बाजू निवडणार, भांडण लावणारी की चूल पेटवणारी

शिवसेना पक्ष प्रमुख अनेकांचा मास्क उतरवणार

WHOआपण दाखवले धारावी पॅटर्न काय असतो

शिवसैनीक आमचे कवच कुंडल आहेत

शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल

हिदूत्वाचा राजकारणासाठी वापर – एकनाथ शिंदे

ईडी पीडा मागे लागली म्हणून शिवसेना घाबरणार नाही – एकनाथ शिंदे

शिवसैनिक कोणालाही घाबरणार नाही – एकनाथ शिंदे

मंत्री अदित्य ठाकरे सभास्थळी दाखल

शिवसेनेच्या मास्टर सभेला सुरुवात


राष्ट्रवादी महिला मोर्चाचे आंदोलन

पोलीस ठाण्याबाहेर केतकी हाय हायच्या घोषणा

कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर केतकी चितळेवर शाही फेक

ठाणे पोलिसांनी केतकीला घेतले ताब्यात

केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले


त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

बिप्लब देव यांनी दिला त्रिपुरा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा


मुंबई एनसीबीकडून ड्रग्ज तस्कराला अटक

कोट्यावधींचे माल हस्तगत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार

शिवसेना खासदार विनायक राऊत यांची माहिती


आजारपणामुळे सभेला उपस्थित राहणार नाही – रामदास कदम


नवनीत राणा दिल्लीतील हनुमान मंदिरात पोहोचल्या

मुख्यमंत्र्यांनी ओवेसींवर कारवाई करावी – नवनीत राणा


मुंबई -पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

वाहतूक विस्कळीत

२ किमी पर्यंता वाहनांच्या लांबच लांब रांगा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांचा समाचार घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईच्या बीकेसी मैदानावर होणार सभा

हिंदुत्वावरुन भाजप, मनसे आणि राणांवर करणार पलटवार


दिल्लीत अग्नितांडव आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू

बचावाकार्य करताना २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

आगीवर नियंत्रण आणण्यामध्ये यश


राणा दाम्पत्य दिल्लीतील हनुमान मंदिरात महाआरती करणार