घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणावर मुख्यमंत्री म्हणतात, मी जबाबदारीने सांगतो...!

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री म्हणतात, मी जबाबदारीने सांगतो…!

Subscribe

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार न्यायालयीन लढाई लढत असून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा गेला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर इतर समाजाचं आरक्षण कमी करून एका समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे, असा दावा केला गेला. मात्र, त्या मुद्द्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोडून काढलं. विधिमंडळाचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू असून त्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना विरोधकांच्या टिकेला उत्तर दिलं. तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी यावेळी ठाम भूमिका मांडली.

मी जबाबदारीनं सांगतो…

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी अधिवेशनात विधानसभेत बोलताना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने सांगत आहे की कोणत्याही समाजाचं आरक्षण हिसकावलं किंवा कमी केलं जाणार नाही. तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील महाराष्ट्राची बाजू न्यायालयात टिकेल’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले. ‘विरोधी पक्षनेत्यांनी आधी मोठी टीका केली. गेल्या वर्षभरापासून ते कुंडल्या काढून बसले होते. आत्ताच पडेल, तेव्हाच पडेल. पण सरकार पडलं नाही. पण आता त्यांनी आमचं वर्षपूर्तीचं पुस्तक वाचून दाखवलं. त्यामुळे कुंडल्या वाचणारे आता पुस्तक वाचायला लागले’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -