मुख्यमंत्र्याच्या मास्टर सभेत हनुमानाच्या रुपात शिवसैनिक

मात्र या सर्व गर्दीत लक्ष वेधले आहे ते बाईक रॅलीतील हनुमान रथाने आणि  हनुमानाच्या रुपात आलेल्या शिवसैनिकांनी.

शिवसेनेच्या आजच्या मास्टर सभेत राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने आले आहेत . यावेळी शिवसैनिकांबरोबरच सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी बीकेसीच्या मैदानात गटा गटाने येत आहेत. मात्र या सर्व गर्दीत लक्ष वेधले आहे ते बाईक रॅलीतील हनुमान रथाने आणि  हनुमानाच्या रुपात आलेल्या शिवसैनिकांनी.

कारण सध्या देशभरात हनुमान चालीसावरून राजकारण सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ठाकरे सरकारने हनुमान चालीसा पठण करण्यास विरोध केल्याचे चित्र तयार करण्यात आले. उद्धव ठाकरे हे हिंदूविरोधी असल्याचा कांगावा राणा दाम्पत्य आणि मनसे करत आहे. त्यालाच उत्तर देण्यासाठी आज शिवसैनिकांनी शिवसेना भवन ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली. यात हनुमान रथ आणि हनुमानाच्या रुपात शिवसैनिकही पाहायला मिळाले. शिवसेनेने हिंदुत्व सोडल नसल्याचाच संदेश देण्यासाठी शिवसैनिक हनुमानाच्या रुपात आले होते.