Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी MahaRERA अध्यक्षपदी अजोय मेहतांची वर्णी ? ठाकरे सरकारचा आज निर्णय

MahaRERA अध्यक्षपदी अजोय मेहतांची वर्णी ? ठाकरे सरकारचा आज निर्णय

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता यांना लवकरच नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी (महारेरा) च्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबतचा आदेश आज गुरूवारी निघण्याची शक्यता आहे. महारेराच्या अंतर्गत संपुर्ण रिअल इस्टेट आणि बिल्डर लॉबी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठीच मेहता यांची नेमणुक मुख्यमंत्री करतील अशी चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच याबाबतची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. अजोय मेहता यांनी राज्याच्या प्रशासनात अनेक महत्वाच्या पातळीवर काम केले आहे. माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे प्रधान सचिव, केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांचे स्वीय सहाय्यक तसेच राज्याच्या ऊर्जा विभागापासून, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण ते मुंबई महापालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये प्रशासकीय कारभाराचा हातखंडा असल्याचे अजोय मेहता यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. (CMO chief advisor Ajoy Mehta to be appointed as Chairman Maharera)

कोण आहेत अजय मेहता ?

अजोय मेहता हे १९८४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी संपणार होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. दिलेली मुदतवाढ ३१ मार्च २०२० रोजी संपणार होती. मात्र कोरोनाचा काळ सुरू असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर अजोय मेहता हे नऊ महिने त्याच पदावर कार्यरत राहिले. ३० जून २०२० रोजी मुदतवाढ संपण्या अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेहतांना  मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी दिली. मेहता यांच्या नियुक्तीला कॉंग्रेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही विरोध होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची नियुक्ती करत दोन्ही घटक पक्षांना माझ्या कार्यलयात मी कुणाला नेमायचे हे मी ठरवणार याबाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले होते. अजोय मेहता यांनी आतापर्यंत राज्यातील महत्वाची धोरणे आणि विशेषतः कोरोना काळात आपल्या प्रशासकीय सेवेतील दांडगा अनुभव यातून राज्यासाठी अतिशय महत्वाचे असे योगदाने दिले आहे. अजोय मेहता यांचे महारेराच्या अध्यक्षपदी नाव हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

महारेरा अध्यक्षपदी कशी होते नेमणुक ?

- Advertisement -

महारेराच्या अध्यक्षपदी नेमणुकीसाठी तीन सदस्यीय समितीने अजोय मेहता यांचे नाव निश्चित केले असल्याचे समजते. तीन सदस्यीय समितीमध्ये बॉम्बे हायकोर्टचे न्यायमूर्ती, गृहनिर्माण विभागातील सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव यांनी एकुण सहा नावांपैकी दोन नावे या पदासाठी निश्चित केली होती. एकुण नावांमध्ये अजोय मेहता यांच्यासह निवृत्त सनदी अधिकारी सतीश गवई, माजी मुख्य सचिव बिपीन मलिक यासारखी नावे आहेत. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर गृहनिर्माण विभागाकडून महारेरा अध्यक्षपदाच्या व्यक्तीची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. तीन सदस्यीय समितीसमोर असणाऱ्या नावांपैकी किंवा त्यांच्या अपेक्षित असलेली अशी नावे यामधून अध्यक्षपदी अधिकारी नेमणुकीचा अधिकार हा समितीला आहे. महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांचा कार्यकाळ १८ जानेवारीला संपलेला आहे. त्यामुळेच या रिक्तपदासाठी नव्या अध्यक्षाची शोध ठाकरे सरकारकडून सुरू झाली होती.


 

- Advertisement -