Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार; शरद पवार शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार; शरद पवार शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारण चर्चा रंगली असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघेल का हे माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार आहे. (CM’s throne will move soon, Sanjay Raut’s reaction on Sharad Pawar’s visit to Shinde)

संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला निमंत्रण द्यायला गेला तर त्यात राजकारण काय असते. शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. आता राज्याच्या दुर्देवाने म्हणा किंवा अजून काही म्हणा मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती बसली आहे. त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला ते गेले. ते मुख्यमंत्रीपदावर बसलेल्याला मान द्यायला गेले होते, व्यक्तीला नाही. त्यात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले, हलले असे काही नाही झाले. उलट त्यांच सिंहासन हलणार आहे लवकर तुम्ही बघा, अशी मिश्किल टीप्पणी संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे हा शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा अजेंडा – संजय राऊत

- Advertisement -

सदिच्छा भेट होती – एकनाथ शिंदे
पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती आणि मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. तसेच या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी भेट घेतली – शरद पवार
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर वर्षा निवासस्थानाबाहेर आल्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांनी या भेटीसंदर्भात आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून स्पष्टीकरण दिले. शरद पवार म्हणाले की, मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले.

- Advertisment -