घरमुंबईकांदिवलीत पेट्रोल पंपावर सीएनजी गॅसचा स्फोट

कांदिवलीत पेट्रोल पंपावर सीएनजी गॅसचा स्फोट

Subscribe

मुंबई:-कांदिवलीमध्ये रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरताना शनिवारी सकाळी सात वाजता अचानक स्फोट झाला. कांदिवली पश्चिम येथील मिलाप टॉकीजजवळच्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली. या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. कांदिवलीच्या मिलाप पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी रांग लागली होती. एका नव्या रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरत असताना स्फोट झाला. या स्फोटामध्ये उभ्या राहिलेल्या काही रिक्षांचे नुकसान झाले आहे. तर ज्या रिक्षामध्ये सीएनजी भरण्यात येत होता त्या रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. अनिल शिवराम मोरे (५७ वर्ष), सोहेल कमाल अहमद शेख (५७ वर्ष) आणि शैलेश कृपाशंकर तिवारी (२५ वर्ष) अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -