CNG Price Hike : सीएनजीच्या किंमतीत पुन्हा 2 रुपयांची वाढ

सीएनजीच्या किंमती 2 रुपयांनी वाढल्या असल्याने मुंबईत आजचे सीएनजीचे दर हे 76.00 रुपयांवर होते, ते आता आणखी दोन रुपयांनी वाढणार आहेत. त्यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांच्या खिशावर याचा भार पडला आहे.

देशात सीएनजीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात सर्वसामान्य महागाईने बेजार झाला असाताना आता खिशावरचा फार आणखी वाढला आहे.

सीएनजीच्या किंमती 2 रुपयांनी वाढल्या असल्याने मुंबईत आजचे सीएनजीचे दर हे 76.00 रुपयांवर होते, ते आता आणखी दोन रुपयांनी वाढणार आहेत. त्यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांच्या खिशावर याचा भार पडला आहे. मागील अनेक दिवसांपासून इंधनापासून ते सीएनजी आणि घरगुती गॅस सर्वांच्याच किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

मुंबई पेट्रोलचा दर 120 रुपये लीटर आहे. तसेच डिझेलचा दर 105 रुपयांनी विकलं जातंय. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या दरम्यान असून डिझेलचही शंभरीच्या पार जाऊन बरेच दिवस झाले आहे. त्यात आता सीएनजी आणख दोन रुपयांनी वाढल्याने आता चिंता वाढली आहे. तसंच, घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती या महिन्यात वाढल्या आहेत. 50 रुपयांच्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत आता 999.5 रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबईतही या सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1026 रुपये आहे आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 1015.50 रुपये झाली आहे. नोएडामध्ये त्याची किंमत 997.5 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी 10 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. मोठ्या शहरांमध्ये त्याच्या किंमतीत 104 रुपयांपर्यंत वाढ नोंदवली गेली.

गेल्या अनेक दिवसांपासून इंधनासह जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शिवाय महिन्याच्या आर्थिक खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे विकासकामांनां योग्य प्रमाणात निधी देता आला नाही : अजित पवार