Saturday, March 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी विद्यार्थी-पालक समन्वय समितीने राज ठाकरेंची घेतली भेट

विद्यार्थी-पालक समन्वय समितीने राज ठाकरेंची घेतली भेट

Related Story

- Advertisement -

विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली आहे. फी वाढीविरोधात आणि अकरावीच्या प्रवेशबाबत मुद्दे घेऊन विद्यार्थी-पालक समन्वय समितीने राज ठाकरेंची भेट घेतली.

खासगी डॉक्टर, डब्बेवाले, जीम मालक, मूर्तिकार आणि कोळी महिलांनंतर आज राज ठाकरेंची विद्यार्थी-पालक समन्वय समितीने कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लावा, अशी विद्यार्थी-पालकांनी मागणी केली आहे. जर प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली तर कॉलेज कधी सुरू होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न असून काही विद्यार्थ्यांचे Admission झाले आहेत. तर त्याचे काय होणार अशा प्रकारे मुद्दे आज राज ठाकरेंसमोर विद्यार्थी-पालक समन्वय समितीने मांडले आहेत. तसेच यामध्ये काही पालकांचा फी वाढीचा देखील मुद्दा होता. काही शाळांनी राज्य सरकारच्या जीआरनंतरही फी वाढ केली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या भेटीमध्ये कोचिंग क्लासेसचे मालकही उपस्थित होते. कोंचिग क्लालेस सुरू करावेत, अशी त्यांची मागणी होती. यासंदर्भात राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या फोनवरुन चर्चा केली.

- Advertisement -

मागील काही महिन्यांपासून अनेकजण राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत आहेत. मागच्या आठवड्यात वीज प्रश्नावरुन राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्याची यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी वाढीव वीजबिलासंदर्भातील मुद्दा राज्यपालांसमोर मांडला. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, शिरीष सावंत यांच्यासह मनसे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला हजर होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन १० ते १५ मिनिटे चर्चा केली. राज्यपालांशी राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट होती.


हेही वाचा – वैद्यकीय शाखेतील प्रवेश सुरु होणार, मराठा समाजाच्या विद्यार्थांसाठी घेतला ‘हा’ निर्णय


- Advertisement -

 

- Advertisement -