घरमुंबईशहरांमध्ये पार पडले 'सामुदायिक विवाह सोहळा'

शहरांमध्ये पार पडले ‘सामुदायिक विवाह सोहळा’

Subscribe

दरवर्षीप्रमाणे यंदाही अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्ट आणि कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने गरीब आणि गरजू मुला-मुलींचा 'सामुदायिक विवाह सोहळा' पार पडला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथच्या अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्ट वतीने मुस्लिम समाजातील गरीब आणि गरजू मुला-मुलींचा ‘सामुदायिक विवाह सोहळा’ अंबरनाथ येथील हजरत गैबन शाह वली दर्गाह मैदान याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण १७ जोडपे विवाह बंधनात अडकले असून मुस्लिम रितीरिवाजप्रमाणे हा सोहळा पार पडल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हाजी तनवीर शेख यांनी दिली आहे. तर दुसरीकडे देखील कुणबी प्रतिष्ठानच्यावतीने भिवंडी तालुक्यातील पालखणे येथे सामूहिक विवाह करण्यात आला आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील मुला-मुलींचा ‘सामुदायिक विवाह सोहळा करण्यात आला आहे. कुणबी प्रतिष्ठान वतीने गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे कुणबी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उदय पाटील यांनी सांगितले आहे. भिवंडी तालुक्यातील पालखणे येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात भिवंडी आणि वाडा येथील सहा विवाह पार पाडले असून त्यामध्ये एक जोडपे हे अपंग असून या नवपरिणीत वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील , जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, संभाजी ब्रिगेत चे नंदकुमार मोगरे यांसह मोठ्या संख्येने प्रतिष्ठित उपस्थित होते.

- Advertisement -

हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष हाजी तनवीर शेख, उपाध्यक्ष हाजी कादर चौधरी, सचिव हाजी युसूफ शेख, सहसचिव समीर शेख, खजिनदार हाजी सय्यद सलीम, ट्रस्टी सलीम सदृ, हाजी अजीज अन्सारी, हाजी असिफ शेख, परवेज अन्सारी, हुसेन जहागीरदार, लतीफ भाई, अक्तरभाई यांच्यासह अंबरनाथ शहरातील सर्व कमिट्यांनी सहकार्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -