बेरंग भिंती रंगल्या; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारले समानतेचे चित्र

मुंबई – डॉ.भानुशाली नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या (Dr. Bhanuben Nanavati College of Pharmacy) दायित्व समितीने बोरिवलीतील चिकूवाडी येथे ओसाड पडलेल्या भिंतींना जिवंत करण्याचं काम केलं आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातातील चित्रकलेने भिंती रंगवून काढल्या आहेत. या भिंती रंगवताना त्यांनी समाजाला सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे. इक्वालिटी म्हणजेच समानता असा संदेश त्यांनी आपल्या चित्रकौशल्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

dayitwa

महाविद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. तसंच, ही रंगरंगोटी सुरू असताना अनेक स्थानिकांनीह सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं.