घरमुंबई‘कोमसाप’चे वाड्मयीन पुरस्कार जाहीर

‘कोमसाप’चे वाड्मयीन पुरस्कार जाहीर

Subscribe

कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०१८-१९ चे वाड्मयीन व वाड्मयेत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ‘कोकण साहित्य भूषण’ तर डॉ. महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. रोख रुपये १० हजार, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ झाराप येथील डॉ. प्रसाद देवधर, मालवण कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांना वाड्मयेत्तर पुरस्कार तर मुळ खारेपाटण येथील असलेल्या डॉ. अनुजा जोशी यांना त्यांच्या काव्य संग्रहासाठी आरती प्रभू स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कादंबरीचा वी.वा. हडप स्मृती द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तनुजा उल्हास ढेरे (गोष्ट एका वळणावरची), कथासंग्रहाचा वी.सी. गुर्जर स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार भा.ल. महाबळ (ओळख) तर विद्याधर भागवत स्मृती व्दितीय क्रमाकांचा पुरस्कार अरविंद हेब्बार (दरवळ), कविता वाड्मय प्रकारचा आरती प्रभू स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार डॉ. अनुजा जोशी (उन्हाचे घुमट खांद्यावर) तर वसंत सावंत स्मृती द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार प्रशांत डिंगणकर (दगड), चरित्र-आत्मचरित्रासाठी धनंजय कीर स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार शिल्पा सुर्वे (हिराबाई पेडणेकर) तर श्रीकांत शेट्ये स्मृती व्दितीय क्रमाकांचा पुरस्कार उमाकांत वाघ (वळख), समीक्षा ग्रंथासाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. अंजली मस्करेन्हस (आदिवासी लोककथा मीमांसा), ललित गद्यासाठी अनंत काणेकर स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार विनया जंगले (मुक्या वेदना बोलक्या संवेदना), ललित गद्यासाठी लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती व्दितीय पुरस्कार आर.एम. पाटील (आठवणीतील पानगळ साठवणीतील गुलमोहोर), बाल वाड्मयसाठीचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार रेखा आदित्य जेगरकल (स्वाती, अक्षय आणि तुम्ही सारे), संकीर्ण वाड्मयसाठीचा वि.कृ. नेरुरकर स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार डॉ. किरण सावे (चार्वाक दर्शन प्रासंगिकता), अरुण आठल्ये स्मृती द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार वैभव दळवी (समुद्रायन), नाटक-एकांकिकेसाठीचा रमेश कीर पुरस्कार शांतीलाल ननावरे (हि वाट दूर जाते) तसेच ‘कोमसाप’चा विशेष पुरस्कार विकास वराडकर (बॅनरांजली) यांना जाहीर झाले आहेत. प्रथम क्रमाकांना रोख रुपये ५ हजार, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह व व्दितीय क्रमाकांना ३ हजार सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -