Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमPilot Srishti Tuli Death : सृष्टीची हत्या की आत्महत्या; पायलट सृष्टीच्या काकांच्या...

Pilot Srishti Tuli Death : सृष्टीची हत्या की आत्महत्या; पायलट सृष्टीच्या काकांच्या दाव्याने निर्माण झाला प्रश्न

Subscribe

एका खासगी विमान कंपनीत वैमानिक असलेल्या सृष्टी तुली हिचा मृतदेह सोमवारी राहत्या घरी सापडला. मात्र, ही आत्महत्या असल्याचे मानले जात असतानाच सृष्टीच्या काकांनी केलेल्या खुलाशामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे.

मुंबई : एका खासगी विमान कंपनीत वैमानिक असलेल्या सृष्टी तुली हिचा मृतदेह सोमवारी राहत्या घरी सापडला. मात्र, ही आत्महत्या असल्याचे मानले जात असतानाच सृष्टीच्या काकांनी केलेल्या खुलाशामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. आता सृष्टीच्या काकांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. (commercial pilot shrishti uncle claims she spoke happily with her mother 15 minutes before her death)

मृत्यूपूर्वी सृष्टीने आपली आई आणि मावशीसोबत आनंदाने गप्पा मारल्या. त्यावेळी ती खूप आनंदात होती. मग असे असताना ती आत्महत्या कशी करेल असा सवाल सृष्टीच्या काकांनी केला आहे. दरम्यान, सृष्टीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल तिचा प्रियकर आदित्य याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bangladesh ISKCON : बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार; सरकारला फटकारले

एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत असलेल्या सृष्टी तुली हिता मृतदेह मुंबईतील एका फ्लॅटमध्ये सापडला. आतापर्यंत ही आत्महत्या असल्याचे मानले जात होते. मात्र, यानंतर तिच्या काकांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यामुळे आता सृष्टीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा प्रश्न समोर येतो आहे.

- Advertisement -

सृष्टीच्या काकांचे म्हणणे आहे की, मृत्यूच्या 15 मिनिटे आधी सृष्टीचे तिच्या आई आणि मावशीसोबत बोलणे झाले होते. आणि तेव्हा ती खूप आनंदात होती. त्यामुळेच सृष्टीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

सृष्टीच्या काकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. तिच्या काकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सांगितले की, तिने आत्महत्या केली. पण असे काय घडले ज्यामुळे ती एवढ्या टोकाचे पाऊल उचलले. सृष्टीचे आपली आई आणि मावशीसोबत काय बोलणे झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.

मुंबईमधील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली या वैमानिक तरुणीने आत्महत्या केल्याचे सोमवारी समोर आले. 25 वर्षीय सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम करत होती. अंधेरी पूर्व येथील मरोळ येथे भाड्याच्या घरात राहणारी सृष्टी ही मूळ उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची आहे. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (25 नोव्हेंबर) सृष्टी ही घरात मृतावस्थेत आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. अंधेरी पोलिसांना सकाळी 8 वाजताच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली, त्यानंतर महिलेचे पार्थिव घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरांनी मृत्यूचे कारण सांगितले.

हेही वाचा – Cold Weather : येत्या तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा; सर्वाधिक तापमान कुठे?

डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात, सृष्टीचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले. तिने स्वतःच फाशी घेत आत्महत्या केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी म्हणाले की, पोलिसांनी याबाबत अधिक तपास करत नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. सृष्टीचा तिच्या प्रियकरासोबत वाद झाला होता, दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यातूनच ती त्रस्त होती, म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय यावेळी तिच्या जवळच्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आरोपी युवकाचे नाव आदित्य पंडित असून तो 27 वर्षांचा आहे. त्याच्याविरोधात कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -