घरताज्या घडामोडीपालिकेत सर्वपक्षीयांना कार्यालये वापरण्यास आयुक्तांची परवानगी

पालिकेत सर्वपक्षीयांना कार्यालये वापरण्यास आयुक्तांची परवानगी

Subscribe

माजी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, माजी  समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख,  माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आदींनी गुरुवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या कार्यालयात त्यांची धावती भेट घेतली

मुंबई :  मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने आणि पदे गेल्याने आता  माजी महापौर, माजी उप महापौर यांसह सर्व समिती अध्यक्ष यांच्या गाड्या काढून घेण्यात आल्या आहेत. मात्र पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालये वापरण्यास पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी परवानगी दिली आहे.

माजी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, माजी  समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख,  माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आदींनी गुरुवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या कार्यालयात त्यांची धावती भेट घेतली. यावेळी, या सर्वपक्षीय गटनेत्यांनी आम्हाला पक्ष कार्यालय वापरण्यास परवानगी असणार की नाही, असे विचारले. त्यावर आयुक्त चहल यांनी, तुम्ही पक्ष कार्यालय वापरू शकता, असे सांगत त्यांना परवानगी दिली.

- Advertisement -

त्यामुळे आता सर्व पक्षीय गटनेते यांना निवडणूक होईपर्यंत पालिका मुख्यालयातील पक्षीय कार्यालये वापरता येणार आहेत. अन्यथा त्यांना पालिकेत काही कामासाठी आल्यानंतर बसायला, वापरायला कार्यलयासारखी ठराविक जागा उपलब्ध न झाल्यास त्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता. त्यामुळे आता सर्वपक्षीय गटनेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा –  Maharashtra Budget 2022 : सोने-चांदी स्वस्त होणार, अजित पवारांचं मोठं गिफ्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -