घरCORONA UPDATEपत सरंचनेवर उपाय शोधण्यासाठी समिती; दोन महिन्यात राज्य सरकारकडे अहवाल सादर

पत सरंचनेवर उपाय शोधण्यासाठी समिती; दोन महिन्यात राज्य सरकारकडे अहवाल सादर

Subscribe

राज्यातील व्यावसायिक, नोकरदार यांना कर्जपुरवठा करण्यात नागरी सहकारी सहकारी बँका आणि नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थावर देखील लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे.

कोरोना अटकाव करण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत सरंचनेवर होणारे दूरगामी परिणाम तसेच त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. राज्यातील व्यावसायिक, नोकरदार यांना कर्जपुरवठा करण्यात नागरी सहकारी सहकारी बँका आणि नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थावर देखील लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. यासंदर्भातही समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या दोन्ही समित्या अभ्यास करुन दोन महिन्यात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करतील.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात समाजिक आणि आर्थिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीचे योगदान मोठे आहे. राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था कार्यरत असून राज्यातील साडेपाच कोटी नागरिक विविध सहकारी संस्थाचे सभासद आहेत. राज्याच्या सहकार क्षेत्रात खेळते भांडवल सुमारे साडेतीन लाख कोटी असून सहकार क्षेत्रात सुमारे ३० लाख पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शेती, पीक कर्ज पुरवठा करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही समिती अभ्यास करणार आहे.

- Advertisement -

या समितीचे अध्यक्ष सहकार आयुक्त अनिल कवडे असतील. तर सहकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, श्रीकृष्ण वाडेकर, अजित देशमुख, शैलेश कोतमिरे, डॉ. संतोष कोरपे, प्रताप चव्हाण, अशोक खरात, डी.एस.साळुंखे हे या समितीचे सदस्य आहेत. तसेच व्यावसायिक, नोकरदार यांना कर्जपुरवठा करणाऱ्या नागरी सहकारी बँका आणि ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थांविषयी अभ्यास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर हे अध्यक्ष आहेत. या समितीत धनंजय डोईफोडे, जयंत जळगावकर, काका कोयटे, जिजाबा पवार, आनंद कटके, मिलिंद सोबले हे सदस्य आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -