घरमुंबईनवी मुंबईत स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

नवी मुंबईत स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

Subscribe

सिडकोकडून 'सर्वांसाठी घर' या केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ९० हजार घरे बांधण्यात येणार

उदरनिर्वाहच्या निमित्ताने लाखो नागरिक मुंबईत येतात. काही जण हाताला मिळेल ते काम करतात आणि मुंबईत भाड्याचे घर घेऊन राहू लागतात. मुंबईत घरांची किंमत गगणाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अशक्यच असल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या अशा हजारो नागरिकांचे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण सिडकोकडून ‘सर्वांसाठी घर’ या केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ९० हजार घरे बांधण्यात येणार आहेत.


हेही वाचा – प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सिडकोची कारवाई

- Advertisement -

राखीव भूखंडावर सिडको घरे उभारणार

नवी मुंबई, उरण, उलवे, वाशी आणि पनवेल पालिका हद्दीतील काही जागा बसस्थानक आणि कमर्शिअल इंडस्ट्रीज उभारण्यासाठी राखीव ठेवली होती. त्या जागेवर ९० हजार घरे उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कॅपासाईट इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदार कंपनीला घरे उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.


हेही वाचा – सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिजचे डोंगर

- Advertisement -

 

सिडको नवी मुंबईतील ‘या’ जागांवर उभारणार घरे

सिडको खारघर येथील रेल्वेस्थानक, खाडीलगत असलेल्या सेक्टर १ (अ); तर सेक्टर – १४ मध्ये बसस्थानकासाठी राखीव ठेवलेल्या रघुनाथ विहारसेजारील खारघर गाव मेट्रो स्थानकाशेजारील मोक्याच्या जागी घरे उभारली जाणार आहेत. त्याचबरोबर खारघर सेक्टर-४३ मध्ये नावडे गावच्या मागील बाजूस, कळंबोली सेक्टर १७ आणि नवीन पनवेल सेक्टर – १८ या ठिकाणी बस टर्मिनलसाठी राखीव असलेल्या जागेवर, तर खांदेश्वर रेल्वेस्तानक सेक्टर- २८ आणि वाशी ट्रक टर्मिनल आदी ठिकाणी २० हजार घरे उभारली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -