घरताज्या घडामोडी२४ तासं सुरु असणार 'अन्नपूर्णा' फ्रिज; दूध, फळे, भाज्या सर्व जेवण मिळणार...

२४ तासं सुरु असणार ‘अन्नपूर्णा’ फ्रिज; दूध, फळे, भाज्या सर्व जेवण मिळणार फुकटात

Subscribe

दादर पश्चिममध्ये पहिल्या कम्युनिटी फ्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे. अस्तित्व ट्रस्ट संस्थेने पुढाकार घेऊन 'अन्नपूर्णा' फ्रिजची सुरुवात केली आहे.

कल्पना करा, तुम्ही रस्त्याने जात आहात. रात्री झाली आहे आणि तुम्हाला प्रचंड भूक लागली आहे. पण, हॉटेल्स देखील बंद आहेत. अशावेळी जर तुम्हाला रस्त्यात सर्व खाद्यपदार्थांने भरलेला फ्रीज दिसला तर. विशेष बाब म्हणजे ते जेवण तुम्हाला अगदी फुकटात उपलब्ध असणार. आश्चर्य वाटलेना. पण, हे सत्य आहे. दादर पश्चिममध्ये पहिल्या कम्युनिटी फ्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे. अस्तित्व ट्रस्ट संस्थेने पुढाकार घेऊन ‘अन्नपूर्णा’ फ्रिजची सुरुवात केली आहे.

‘अन्न हे पूर्णब्रह्म’, असं म्हणणारी आपली संस्कृती आहे. पण, सध्या अनेक ठिकाणी केवळ अन्नाचा नाश होताना दिसत आहे. हॉटेल्स, मंगल कार्यालय आणि घरोघरी अन्न वाया जात आहे. एकीकडे अन्न टाकून दिले जाते तर दुसरीकडे अन्नाचा दाणा सुद्धा कधी कधी भूकेलेल्यांना पाहायला मिळत नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र, अशा गरजू व्यक्तींच्या जेवणाची दादर येथे सोय करण्यात आली आहे. दादर पश्चिममध्ये पहिल्या कम्युनिटी फ्रिजचे उद्घाटन करण्यात आले असून अस्तित्व ट्रस्ट संस्थेने पुढाकार घेऊन ‘अन्नपूर्णा’ फ्रिज हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे आता गरजूंना आणि भूकेलेल्यांना सहज जेवण उपलब्ध होणार आहे. ही संकल्पना अस्तित्व ट्रस्टच्या अध्यक्षा सुनीता वाडकर यांची असून त्यांच्यासोबत हिमानी दळवी, रचना जाधव, शिल्पा वेंगुर्लेकर, विवेक नाईक, आशय मुंबरकर, कविता शेट्टी, रती प्रधान यांनी देखील साथ दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अंधेरीत भीषण अपघात: क्रेन बस स्टॉपवर कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -