घरमुंबईअनंत गीते यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

अनंत गीते यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

Subscribe

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी आचारसंहिता भंग केल्याबाबतची तक्रार आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे वकील सचिन जोशी यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना तक्रारीबाबत कार्यवाही करून कार्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गीते यांच्या प्रचाराकरिता कार्य अहवालाची सिंहावलोकन ही पुस्तिका काढण्यात आलेली आहे. मात्र या पुस्तिकेवर कुठेही प्रकाशक, वितरक व किती प्रती छापल्या आहेत याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. प्रचारात कार्यअहवालाचा वापर करताना त्याबाबतची सक्षम अधिकार्‍यांची परवानगी घेणेही गरजेचे आहे.

- Advertisement -

मात्र अशी कोणतीही परवानगी व प्रकाशक, वितरक, प्रती याची माहिती छपलेली नाही. त्यामुळे आचारसंहिता भंग झाला असल्याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे. गीते हे वारंवार तटकरे यांच्या विरोधात व्यक्तीशः खोटे व खोडसाळ आरोप करीत आहेत, असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -