घरमुंबईमुंबई, ठाण्यातील गुन्हेगारांचा वावर वाढला

मुंबई, ठाण्यातील गुन्हेगारांचा वावर वाढला

Subscribe

आमदार हितेंद्र ठाकूर यांची तक्रार

शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्यासोबत प्रचारात गुन्हेगारी टोळीचे सदस्य उघडपणे फिरू लागले आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील गुन्हेगारीव अपप्रवृत्तींचा वावर वाढला असल्याने वसई विरार परिसरात दहशतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट अशा घटना घडू नये म्हणून पोलीस बळ वाढवण्यात यावे, अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आणि पालघर पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

प्रदीप शर्मा यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत ठाकूर यांनी अनेक आरोप केले आहेत. शर्मा यांची पोलीस सेवेतील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यामुळे शर्मा यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल करणे, बनावट चकमकमध्ये निरपराध लोकांना ठार मारणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून काही केसेसमध्ये चौकशी व काही केसेसमध्ये त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले सुरु आहेत, असेही ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

शर्मा दीपक उपाध्याय सारख्या अनेक गुन्हेगार टोळीच्या सदस्यांना जोडीला घेऊन प्रचार करीत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत ते कोणत्याही प्रकारची खोटी केस वा खोटा हल्ला स्वतःवर दाखवून त्यांच्याच टोळीतील कोणाही सदस्याला हजर करून काहीतरी स्टंट करुन माझ्या, माझ्या कुुटुंंबियांवर अथवा पक्षाच्या पदाधिकार्‍यावर खोट्या केसेस करण्याचे षडयंत्र रचले जाणार असल्याची मला माहिती मिळाली आहे, असेही ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले आहे. माझ्यावर आणि माझा मुलगा आमदार क्षितीज ठाकूर यांच्यावर निवडणुकीच्या काळात हल्ला होण्याचीही शक्यता असून आपण आमच्या पोलीस संरक्षणात वाढ करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -