घरCORONA UPDATECoronaVirus: कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली; एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

CoronaVirus: कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली; एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

Subscribe

मंगळवारी महापालिका क्षेत्रात नवीन १८ रूग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३८५ वर पोहोचली आहे.

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. आतापर्यंत मृत्यूची संख्या ७ झाली आहे. मंगळवारी महापालिका क्षेत्रात नवीन १८ रूग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३८५ वर पोहोचली आहे.

कल्याण पश्चिमेतील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा तर डोंबिवली पूर्वतील ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याण डोंबिवलीत प्रत्येकी आठ आणि आंबिवली-मोहने आणि टिटवाळा येथे प्रत्येकी एक असे १८ रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत १३० रूग्ण हे उपचार होऊन घरी परतले आहेत तर विविध रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या २४८ आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य पथकाने केला पाहणी दौरा

शास्त्रीनगर रुग्णालय डेडिकेटेड कोविड रुग्णालय करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कल्याण डोंबिवलीचा पाहणी दौरा केला. कोरोना रोखण्यासाठी आणि रुग्णांसाठी महापालिका प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवलीत करण्यात आलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या केंद्रीय पथकाने डोंबिवलीतील मढवी नागरी आरोग्य केंद्राला भेट देत तिथल्या कामाची, महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपाय योजना केले जाणारे सर्वेक्षण आदींची सखोल माहिती घेतली. तसेच कोरोना कंटेंनमेंट झोन असणाऱ्या साईनाथवाडी, म्हात्रे नगर येथे प्रत्यक्ष भेट देत सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यामध्ये आणखी काय सुधारणा केल्या पाहिजे, याबाबत सूचनाही दिल्या. तर कल्याण डोंबिवलीत येण्यापूर्वी त्यांनी भिवंडी बायपास टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरची पाहणी करून समाधान व्यक्त केले. दरम्यान डोंबिवलीतील महापालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड रुग्णालय करण्याच्या सूचनाही या केंद्रीय पथकाने दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -