घरताज्या घडामोडीकेडीएमसीत प्रभाग आरक्षणांच्या भितीने प्रस्थापितांमध्ये धडकी

केडीएमसीत प्रभाग आरक्षणांच्या भितीने प्रस्थापितांमध्ये धडकी

Subscribe

कल्याण - डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याची जोरदार मागणी सुरू आहे. त्यामुळे २७ गावे वगळल्यानंतर प्रभागांची संख्या कमी होणार असून आरक्षणातही बदल होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर २०२० मध्ये होणार आहे. महापालिकेचे एकूण १२२ प्रभाग असून प्रभाग आरक्षणात बदल होणार आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने ६१ प्रभाग महिलांसाठी राखीव होणार आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांमध्ये धडकी भरली आहे. दरम्यान, २७ गावे महापालिकेतून वगळण्याची जोरदार मागणी सुरू आहे. त्यामुळे २७ गावे वगळल्यानंतर प्रभागांची संख्या कमी होणार असून आरक्षणातही बदल होऊ शकतो. त्यामुळे २७ गावांच्या बाबतीत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

महापालिकेची निवडणूक पॅनेल पध्दतीने होणार नाही

महापालिकेची निवडणूक पॅनेल पध्दतीने होणार नसल्याने नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. एक प्रभाग, एक नगरसेवक अशा पध्दतीनेच ही निवडणूक होणार आहे. सध्या महापालिकेत एकूण १२२ प्रभाग आहेत. महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाप्रमाणे ६१ प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे नवे आरक्षण काढताना आताचे ६१ प्रभाग हे वगळले जाणार आहेत. तसेच यापूर्वी जे प्रभाग अनुसुचित जाती अनुसुचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण होते ते प्रभागही यंदाच्या आरक्षण काढताना वगळले जाणार आहेत. त्यामुळे नव्या प्रभाग आरक्षणात मातब्बरांना चांगलाच धसका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आपली पत्नी सून अथवा कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रभागातील विविध कार्यक्रमांच्या बॅनरवर अथवा पत्रकावर त्या नगरसेवकाबरेेाबरच त्याच्या कुटुंबातील महिलेचा फोटोही छापून प्रसिध्दी करण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर पालिकेची निवडणूक आल्याने राजकीय पक्षही सक्रीय झाले आहेत. त्यामुळे नव्या प्रभाग आरक्षणात कोणाला धक्का सहन करावा लागतो याकडेही लक्ष लागले आहे.

- Advertisement -

सहा महिने आधीच निर्णय घ्यावा लागणार

१ जून २०१५ रोजी २७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ ला महापालिकेची निवडणूक पार पडली. २७ गावे समाविष्ट झाल्याने १०७ प्रभागांची संख्या १२२ वर पोहचली. तसेच त्यामुळे अनेक प्रभागही कमी झाले तर अनेक वाढले होते. यंदा २७ गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी जोरदारपणे सुरू आहे. जर २७ गावे वगळायची असतील तर सहा महिने अगोदरच राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. २७ गावे वगळल्यास प्रभागांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागल आहे.

सध्याचे प्रभाग आरक्षण

प्रभाग संख्या : १२२
अनुसुचित जाती : १२
अनुसुचित जमाती : ३
नागरिकांचा मागास प्रवर्ग : ३३
महिला प्रवर्ग : ६१

- Advertisement -

महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग आरक्षणाची सोडत साधारण जून ते जूलैमध्ये काढली जाण्याची शक्यता आहे. आता जे प्रभाग आरक्षित आहे. ते प्रभाग वगळून इतर प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. २७ गावे महापालिकेत राहणार कि जाणार याचा निर्णय राज्य सरकारला सहा महिने अगोदरच घ्यावा लागणार आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होते त्यावेळी लोकसंख्येनुसार प्रभाग रचना सीमा बदलत असते.  – संजय जाधव, सचिव केडीएमसी


हेही वाचा – आता महिलांसाठी विशेष पोलीस ठाणे आणि न्यायालय; ठाकरे सरकारची योजना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -