घरमुंबई'तुमच्या जिद्द, समर्पणाला सलाम!', सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

‘तुमच्या जिद्द, समर्पणाला सलाम!’, सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Subscribe

संशोधक,तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. वाँगचूक यांच्या प्रयोगाचे ,’ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनम जी सलाम!’ अशा शब्दांत कौतुक देखील केले आहे.

मुख्यमंत्री अभिनंदन करताना असे म्हणाले की, ‘देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादित प्रदेश, कडाक्याची थंडी या निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देतानाच, देशाच्या सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जीगरबाज जवान डोळ्यात तेल घालून सतर्क असतात. या जवानांचा आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ. या शब्दांसह, सोनम जी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…जय हिंद!!’

- Advertisement -

लडाखमधील सैनिकांना थंडीपासून बचावासाठी केला टेंट 

लोकप्रिय हिंदी चित्रपट ‘थ्री इडियट्स’ यामध्ये अमिर खान याने फुंशुक बांगडू याची व्यक्तिरेखा साकारली. ज्या व्यक्तिकडून अमिर खान याने फुंशुक बांगडू या भूमिकेसाठी प्रेरणा घेतली होती. ती व्यक्ती लडाखमधील सोनम वांगचूक ही आहे. ज्यांची लडाखमध्ये शाळा आहे. ही व्यक्ति सतत जगावेगळे प्रयोग करीत असते.असाच नवा प्रयोग त्याने टेंट बनवण्यासाठी केला. त्याने लडाखमधील सैनिकांचे कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी टेंट तयार केला असून, याबाबत त्याने ट्विट् केले आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -