घरमुंबईकाँग्रेस विचारधारेला संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे - बाळासाहेब थोरात

काँग्रेस विचारधारेला संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे – बाळासाहेब थोरात

Subscribe

देशात झालेल्या पाच राज्याच्या निवडणूका काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या निराशा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत माहिती काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी दिली. यावेळी काँग्रेस विचारधारेला संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. ते म्हणाले काँग्रेस पक्षाचे लक्ष्य 2024 आहे. देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आनू. टिळक भवन येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजूंच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते.

राज्यस्तरीय शिबीर –

- Advertisement -

काँग्रेस कमिटीच्या उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रात दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 1 आणि 2 जूनला हे शिबीर शिर्डीत पार पडणार आहे. या शिबिरात राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या शिबीरातून उदयपूरच्या शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

लक्ष्य 2024 –

- Advertisement -

यावेळी सध्या देशातील वातावरण बदलेले आहे. संविधानावर घाला घातला जात आहे. तसेच काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे. हे हल्ले परतवण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. सर्वात महत्वाची विचारधारा आहे, ती रुजली पाहिजे. काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देतं एक दिवस पुन्हा काँग्रेसची सत्ता देशात व राज्यात येईल यासाठी प्रयत्न करुया. आता आपले लक्ष्य हे 2024 असेल, असे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपच्या कारभाराची करणार पोलखोल –

उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करताना केंद्रातील मोदी सरकारने 8 वर्षापासून सुरु केलेल्या कारभाराची पोलखोल काँग्रेस करणार आहे. भाजपाच्या काळात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यां प्रश्नावर भाजप कशी अपयशी ठरला ते जनेतपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. केंद्रातील भाजपा सरकारचा दृष्टीकोन हा केवळ व्यापारी राहिला आहे. त्यातून काँग्रेसने उभे केलेले सर्व काही विकून खाजगीकरण केले जात आहे. लोकशाही व संविधान व्यवस्था धोक्यात आलेली आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आवाज उठवणार असून ब्रिटिशांविरोधात लढलो तसेच आता भाजपाविरोधात काँग्रेस कार्यर्त्यांना लढावे लागेल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -