घरमुंबईराम कदमांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस

राम कदमांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस

Subscribe

राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुबोध भावजी यांनी कदम यांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यासोबतच दहिहंडी समन्वय समीतीनेही राम कदमांच्या दहिहंडीवर बहिष्कार घातला आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुबोध भावजी यांनी तर राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे राम कदम यांच्या वक्तव्या नंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.

दहिहंडी समन्वय समीतीचाही बहिष्कार

आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांवर केलेल्या बेताल विधानामुळे दहिहंडी समन्वय समीतीने देखील राम कदम यांच्या दहिहंडी उत्सवावर बहिष्कार घातला असून पुढच्या वर्षी समन्वय समितीचा सदस्य गोविंदा पथक राम कदम यांच्या दहिहंडी उत्सवात जाणार नाही.

- Advertisement -

घाटकोपरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन

दरम्यान आज घाटकोपरमध्ये देखील राम कदम यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस स्थानकाबाहेर तर कालपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन मांडले आहे. राम कदम यांनी माफी मागितली असली तरी प्रशांत परिचारक यांच्याप्रमाणे कदम यांचेही निलंबन करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

aandolan against ram kadam
घाटकोपर आंदोलन

महिला आयोगाने देखील घेतली गंभीर दखल

राम कदम यांच्या वक्तव्याची आता महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार कदम यांनी महिलांविषयक काही विधाने केली होती. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यामधून त्याचे वार्तांकन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कदम यांच्या या वक्तव्याची आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यापूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -