घरमुंबईसर्व समसमान हवे! काँग्रेस नेत्यांनी दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

सर्व समसमान हवे! काँग्रेस नेत्यांनी दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

Subscribe

समान किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले असून त्यानुसार हे सरकार चालले पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी कमी मिळत आहे. तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे समान असला पाहिजे, अशा प्रमुख मागण्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत. शनिवारी वर्षा निवासस्थानी जाऊन काँग्रेस नेत्यांनी या मागण्या केल्या.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश होता. काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना मिळत असलेला कमी निधी तसेच समान किमान कार्यक्रमासाठी समन्वय समितीशिवाय वरिष्ठांची एक समिती काम करणार असून ती समान किमान कार्यक्रमावर चर्चा करेल, अशी माहिती एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर दिली.

- Advertisement -

बैठकीत निधी वाटप, महामंडळ वाटपाविषयी चर्चा झाली. तसेच समान किमान कार्यक्रमानुसार सरकार चालवण्याविषयी चर्चा केली. तसेच कोरोनाच्या संसर्ग वाढत चालला असला तरी त्यावर लॉकडाऊन हा पर्याय नको. सरकारमधील सर्वांची हीच भावना आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली.

संजय राऊतांविषयी नाराजी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यूपीए अध्यक्षपदाबद्दल केलेल्या विधानावर बैठकीत आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार चालवतना काही गोष्टींचे भान सर्वांनी ठेवायला हवे, असे एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. निधी वाटप, महामंडळ वाटपाविषयी चर्चा झाली. तसंच समान किमान कार्यक्रमानुसार सरकार चालवण्याविषयी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊन नको हीच सरकारमधील सर्वांची भावना आहे, असे म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -