घरमुंबईकाँग्रेसच्या बैठकांवर बैठका; आता घेणार मतदारसंघांचा आढावा

काँग्रेसच्या बैठकांवर बैठका; आता घेणार मतदारसंघांचा आढावा

Subscribe

लोकसभा निवडणुकीत युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरता धुव्वा उडवल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा तशीच वेळ येऊ नये म्हणून सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठका होत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरता धुव्वा उडवल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा तशीच वेळ येऊ नये म्हणून सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठका होत आहेत. त्यातच येत्या ७ आणि ८ जून रोजी काँग्रेसने जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे.

२८८ मतदारसंघाचा घेणार आढावा 

लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या बैठकीमध्ये २८८ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून, या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच सध्याची प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार असल्याने कशा पद्धतीने काम करावे लागेल, याची माहिती जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

- Advertisement -

पराभवानंतर बैठकाच बैठका 

लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणेच यंदाही काँग्रेस-राष्ट्रवादीचा राज्यात दारूण पराभव झाला. राष्ट्रवादीने मागच्या वेळेप्रमाणेच चार जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना माढा आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ गमवावे लागले. काँग्रेसलाही मागच्या वेळेस जिंकलेले नांदेड आणि हिंगोली या दोन मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रपूर येथील एकच जागा काँग्रेसला जिंकता आली. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी मंगळवारी, २८ मे महाआघाडीतील पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाआघाडीतील इतर नेते उपस्थित राहिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -