घरमुंबईभाजप आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

भाजप आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

Subscribe

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर निर्णय आल्यानंतर मत मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

हे आहेत आक्षेप –

- Advertisement -

लक्ष्मन जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती ठिक नाही. मात्र, या दोन्ही आमदारांना विधानपरिषदेसाठी मतदान केले. यावेळी लक्ष्मन जनताप यांची मतपत्रिका त्यांच्याऐवजी इतर कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. तर मुक्ता टिळक यांनी मतपत्रिकेवर आपला पसंतीक्रम टाकल्यानंतर मतपत्रिकेवर सही केली आणि नंतर ती स्लीप फोल्ड करून ती दुसऱ्याच्या हातात दिली. त्यानंतर ते मतपेटीत टाकण्यात आले, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

 

- Advertisement -

काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार –

काँग्रेस पक्षाने याबाबत निवडणूक आयोगाकडे मेल करून तक्रा दाखल केली आहे. लक्ष्मन जगताप आणि मुक्ता टिळक यांची मते रद्द करण्यात यावीत अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली.

हा आहे नियम – 

बॅलेट बॉक्समध्ये कोणाची मदत घेऊन मतदान टाकले यावरून गुप्त मतदानाचा भंग झाला का, हे आता निवडणूक अधिकारी तपासणार आहे. याप्रकरणी अनंत कळसे यांनी, की कन्डक्ट ऑफ इलेक्शनमधील नियम 49 नुसार, एखाद्या मतदाराला त्याच्या शारीरिक मर्यादांमुळे तो मत टाकायला असमर्थ असेल, तर त्याने सहायकाची मदत घेऊ शकतो. सहायक 18 वर्ष पूर्ण झालेला असावा. तर सहायकावर एकच बंधन असते, ते म्हणजे त्याने मतदान हे गुप्त ठेवावे, अशाप्रकारचा हा नियम असल्याचे कळसे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -