घरताज्या घडामोडीपालिकेच्या राखीव निधीतून १५ हजार कोटी काढण्यास काँग्रेसचा विरोध

पालिकेच्या राखीव निधीतून १५ हजार कोटी काढण्यास काँग्रेसचा विरोध

Subscribe

मुंबईसारख्या शहरात शिक्षण व आरोग्य खात्याचे काम महत्वाचे असताना या खात्याच्या निधीला कात्री लावण्याचे काम पालिका प्रशासनाने करणे गंभीर बाब आहे. तसेच, भाजप व शिंदे यांच्या सरकाराने पालिकेचे थकीत साडेसात हजार कोटी रुपये त्वरित द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेत नगरसेवक पदावर नसताना आयुक्त इकबाल चहल यांनी सादर केलेला ५२, ६१९ कोटींचा अर्थसंकल्प हा विचित्र व चुकीचा आहे. त्यामध्ये फक्त घोषणांचा पेटारा आहे. महापालिकेच्या ८८ हजार कोटी रुपयांच्या राखीव निधीमधून १५ हजार कोटी रुपये काढण्यास व पालिका शाळेतील वर्गखोल्या खासगी क्लासेसला भाड्यानेदेण्यास देण्यास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. (Congress oppose withdrawal of 15 thousand crores from the reserve fund of the municipality)

मुंबईसारख्या शहरात शिक्षण व आरोग्य खात्याचे काम महत्वाचे असताना या खात्याच्या निधीला कात्री लावण्याचे काम पालिका प्रशासनाने करणे गंभीर बाब आहे. तसेच, भाजप व शिंदे यांच्या सरकाराने पालिकेचे थकीत साडेसात हजार कोटी रुपये त्वरित द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते कॉंग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे आदी मान्यवर मोहिते उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इकबाल सिंग चहल यांनी सादर करणे, ही गोष्टच मुळात विचित्र आणि चुकीची आहे. कारण एवढा मोठा अर्थसंकल्प एक प्रशासक कसा काय सादर करू शकतो ? हा सर्व जनतेचा पैसा आहे. त्यामुळे याची सभागृहात आणि स्थायी समितीसमोर सर्व अनुषंगाने चर्चा होऊन मग त्यांच्यावर निर्णय घेतला जातो. परंतु येथे आयुक्तांनी या सर्वांना बगल देऊन एक प्रशासक स्वतःच अर्थसंकल्प सादर करतो, ही चुकीची गोष्ट आहे. तसेच, शिंदे आणि फडणवीस सरकारने स्वतःच्या जाहिरातीबाजीसाठी ४२ कोटी एवढी रक्कम खर्च केली असून त्यासाठी मुंबई महापालिकेचे पैसे वापरण्यात आले आहेत, अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला मिळाली. स्वतःच्या जाहिरातबाजीसाठी व पब्लिसिटीसाठी मुंबईकरांचा पैसा हे सरकार वापरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यंदा प्राथमिक शिक्षणाकरिता फक्त ३,३४७.१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज मुंबई महापालिका शाळांची अवस्था इतकी वाईट आहे की कुणीही आपल्या मुलाला महापालिका शाळेत टाकू पाहत नाही. अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. ७ वी आणि ८ वी मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण २८% आहे. असे असताना शिक्षण खात्याच्या निधीलाही कात्री लावण्यात आली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी मुंबई महापालिकेकडून खाजगी क्लासेसला भाडेतत्वावर वर्ग देण्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. हा एक घोटाळा आहे, असा आरोप भाई जगताप करीत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, या अर्थसंकल्पात शहराच्या सौंदर्यीकरणासाठी एका वर्षासाठी १७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे म्हणजे भ्रष्टाचारासाठी कुरणच आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


हेही वाचा – निवडणूक बिनविरोध केल्यास टिळक कुटुंबाला देणार उमेदवारी – चंद्रशेखर बावनकुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -