घरमुंबई"फडणवीस सरकारने मागची पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक केली, हे सिद्ध करेन''

“फडणवीस सरकारने मागची पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक केली, हे सिद्ध करेन”

Subscribe

फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला आणि हे मी कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेल, असा दावाही सचिन सावंत यांनी केला आहे

‘मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती फडणवीस सरकारने मागची पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची पाच वर्षे भाजपाने राजकारण केले आणि मुंबईकरांना फसवले ’, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला आणि हे मी कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेल, असा दावाही सचिन सावंत यांनी केला आहे. मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचे पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले. त्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना सध्या पाहायला मिळत आहे.

मेट्रो कारशेडबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण आहे. त्या जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच आता केंद्र सरकार या जागेवर आपला दावा सांगत आहे, असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारने मेट्रो ३ आणि ६ ची कारशेड कांजूरमार्गला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा आराखडा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आखला होता, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. अश्विनी भिडे यांनी राज्य सरकारला तेव्हा पत्र पाठवले होते. मेट्रो ३ कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा सर्वात उपयुक्त आहे. ही जागा कारशेडसाठी देण्यात यावी, असे त्या पत्रात नमूद करण्यात आल्याचंही सावंत म्हणाले.

- Advertisement -

सचिन सावंत यांनी दिला फडणवीसांना इशारा

कांजूरमार्गची जागा घेण्यासाठी ५ हजार २०० कोटी रुपये भरा, असे कोर्टाने सांगितल्यांचे फडणवीस म्हणतात. पण तसं काही नसताना हे पैसे कुणाला देण्याची भाषा फडणवीस बोलत होते? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे. उलट या जागेमुळे मोठ्या प्रमाणात खर्च वाचणार असल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे. इतकंच नाही तर फडणवीसांना कांजूरमार्गचा डेपो आरेमध्येच करायचा होता. फडणवीसांना हा डेपो आरेमध्येचे का हवा होता? त्यामागे त्यांचा काय उद्देश आहे? हे आपण लवकरच सांगणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.


‘पुनःश्च हरी ॐ म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता’, मनसेचा सरकारला सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -