आम्हाला शत्रू परवडतो, दोस्ती करायची असेल तर प्रामाणिकपणाने करावी – नाना पटोले

Congress state president Nana Patole criticized the NCP
Congress state president Nana Patole criticized the NCP

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जिल्ह्यात भाजपशी युती केली. त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही नानांच्या जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. यावरून नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खूपसल्याचे ट्विट केले. यावर आम्हाला शत्रू सामोरचा परवडतो पण दोस्ती करायची असेल तर प्रामाणिकपणाने करावी, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मालेगावमध्ये ही आमच्या आमदाराला घेऊन गेले. अनेकदा सूचना दिल्या पण काल भंडारा गोंदीयामध्ये युती करून राष्ट्रवादीने आम्ही सत्तेचे पीपासू आहोत. आम्हाला कोणाचा ही संबंध नाही. काँग्रेस आमचा विरोधक आहे, अशा पध्दतीची भूमीका त्यांच्या कृतीतून पहायला मिळाली. म्हणून मला आज ते ट्विट करावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने पाटीत खंजीर खूपसला असे म्हटले आहे. आम्हाला शत्रू सामोरचा परवडतो पण दोस्ती करायची असेल तर प्रामाणिकपणाने करावी ही भूमीका काँग्रेसची आहे. मी आमच्या हायकमांडला जाऊन ही गोष्ट अवगत करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर कशी कूरघोडी करते याच्यावरची भूमीका आम्ही आमच्या हाय कमांकडे मांडू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्या आवाहना विषयी विचारले असता, एकीकडे पाटीत खंजीर खूपसायचा आणि आम्ही टोकाची भूमीका घ्यायची नाही. त्यांना राजकारण करायचे आहे. त्यांना त्यांची पार्टी वाढवायची आहे आम्ही त्याना मदत करायला आलो असे नाही. संगळ्यांना आपली पार्टी मोठी करायचा अधीकार आहे . मात्र, याचा अर्थ असा नाही, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.