घरमुंबई...तर या चुका कॉंग्रेस वारंवार करेल, नाना पटोलेंचा सरकारला इशारा

…तर या चुका कॉंग्रेस वारंवार करेल, नाना पटोलेंचा सरकारला इशारा

Subscribe

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या वक्तव्यानंतर गुजरातमधील कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने यासंबंधीत नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. यावरूनच आता देशासह राज्यातील राजकरण चांगलंच तापलं आहे. आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने राज्यभरात राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईत सुद्धा कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “मोदी त्यांचा मित्र अदानीला कशी मदत करतात यासंदर्भात राहुल गांधी लोकसभेत खुलासा करणार होते. म्हणूनच त्यांचे सदस्यता रद्द करण्यात आल्याचा आरोपही पटोले यांनी केला. चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल तर काँग्रेस ही चूक वारंवार करेल, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हे भाजपनेच घडवून आणलंय. फक्त कोर्टाचं नाव पुढं केलं आहे, असंही ते म्हणाले. मी गावगुंड मोदी संदर्भात बोललो, तरी ते मोदी यांना टोचलं. जेव्हा तो गाव गुंड आणि त्ंयाची पत्नी समोर आली तेव्हा भाजपचं आंदोलन थांबलं. अडाणी यांचे नाव घेतले तर यांना त्रास का होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर यांना काय घाबरणार आहो असा सवाल पटोले यांनी केला. भाजप विरोधातले आंदोलन आणखी तीव्र करणार आहो. भाजपाच्या हुकूमशाही विरोधात आम्ही सत्याग्रह आंदोलन करू असे त्यांनी सांगितले. राहुल गांधींच्या प्रकरणात भाजप वारंवार सांगते की, राहुल गांधी यांनी माफी मागितली असती, तर प्रकरण थांबले असते. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. त्याची अनेक कागदपत्र समोर आहेत. इंग्रजांकडून सावरकरांना साठ रुपये महिना का मिळत होता, असंही त्यांनी म्हंटलं.

जे भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यांना गुजरातच्या निरमा पावडरमध्ये धुतले जाते. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्यांना वाटते ते सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत. चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल. तर काँग्रेस ही चूक वारंवार करेन. असं देखील नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -