घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

Subscribe

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलन.

कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज मुंबईत देखील काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील रिगल सिनेमाजवळ करण्यात आलेल्या आंदोलनात ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुनिल केदार, धीरज देशमुख आदी उपस्थितीत होते.

काय म्हणाले नितीन राऊत?

‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात जे तीन काळे कायदे केले आहेत. ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर घातक आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली आहे, ती ‘वननेशन वन मार्केट’ ते योग्य होतं. त्याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय देत होती. आता यांनी दोन मार्केट या ठिकाणी आणले. शेतकऱ्यांचे पीक हे स्वत:च घेणार आणि शेतकऱ्यांना नाचवण्याच काम या कायद्याद्वारे होणार हे स्पष्टपणे दिसत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनात आम्ही देखील मुंबईमध्ये आंदोलन करत आहोत’, असे मत कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी मांडले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी, पुरोगामी संघटनेकडून आंदोलन

मुंबईप्रमाणे पुण्यात देखील महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनानी आंदोलन केले आहे. अलका चौकापासून महात्मा फुले मंडईपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असल्यामुळे अलका चौकातच निदर्शने सुरु करण्यात आली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Bharat Bandh Live Update: “मोदीजी शेतकऱ्यांकडून चोरी बंद करा,” – राहुल गांधी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -