घरमुंबईराज्यातील 'या' १२ उमेदवारांचा काँग्रेस यादीत समावेश?

राज्यातील ‘या’ १२ उमेदवारांचा काँग्रेस यादीत समावेश?

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आज, सोमवारी त्यांची दुसरी यादी जाहीर करणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील १२ नावांचा समावेश असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आज, सोमवारी त्यांची दुसरी यादी जाहीर करणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील १२ नावांचा समावेश असणार आहे. निवडणुकांच्या घोषणे अगोदरच ७ मार्चला काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश होता दुसऱ्या यादीत कोणत्या उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे, याची उत्सुकता आहे. आज जाहीर होणाऱ्या यादीतील महाराष्ट्रातील १२ संभाव्य नावं समोर येत असून या नावांवर शिक्कामोर्तब होईल का हे पहावं लागणार आहे.

 ही आहे राज्यातील संभाव्य नावं –

नंदुरबार – के सी पाडवी

- Advertisement -

धुळे – रोहिदास पाटील

रामटेक – मुकुल वासनिक

- Advertisement -

हिंगोली – राजीव सातव

नांदेड – अमिता चव्हाण

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी

वर्धा- चारुलता टोकस

यवतमाळ – माणिकराव ठाकरे

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त

दक्षिण-मध्य – एकनाथ गायकवाड/वर्षा गायकवाड

पहिली यादी जाहीर 

यापूर्वी ७ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीतून १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. सर्व राजकीय पक्षाआधी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये ११ उमेदवार उत्तर प्रदेश आणि उर्वरीत ४ उमेदवार गुजरातचे आहेत. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली.

हेही वाचा – 

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये; गुजरातमध्ये यंदा काय होणार?

मी जे बोलतो ते करुन दाखवतो – नितीन गडकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -