घरमुंबईमुंबई पालिकेतही काँग्रेसचे स्वबळ

मुंबई पालिकेतही काँग्रेसचे स्वबळ

Subscribe

राज्यात शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या सुरू असताना काँग्रेस पक्षाने राज्यात सर्वात मोठा पक्ष बनण्याची हाकाटी दिली आहे. आता तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या दृष्टीने आमची संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरू आहे. या पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आमच्या पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेनेच्या मदतीने महाविकास आघाडीचा प्रयोग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यशस्वीरित्या सुरू केला आहे. भाजपने अनेक प्रयत्न करूनही महाविकास आघाडीच्या सत्तेने एक वर्षाचा काळ पूर्ण केला. मात्र, याही परिस्थितीत राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष बनण्याची स्वप्ने काँग्रेस पक्षाकडून पाहिली जात आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर त्यापुढे जाऊन पक्ष स्वबळाची तयारी करत असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

सर्वात महत्वाची निवडणूक समजल्या जाणार्‍या मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली असताना काँग्रेस पक्षाने मात्र स्वतंत्र चूल मांडण्याचे संकेत दिले. मुंबई शहर काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा याआधीच दिला आहे. आता प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही स्वबळावर या पालिकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. या तयारीच्या दृष्टीने आम्ही संघटनात्मक पातळीवर चर्चा करणार आहोत, असे पटोले यांनी म्हटले आहे.

फेकाफेकीचा भाजप फंडा

राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेला शब्द दिला नव्हता, असा दावा करणार्‍या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पटोले यांनी टीका केली. बंद दरवाजाआड शब्द दिला नसेल तर ते सांगायला एक वर्षाचा काळ का गेला, असा सवाल त्यांनी केला. प्रत्येक गोष्टीत फेकाफेक करणे हा भाजपचा फंडा आहे. सेनेला शब्द देताना तो आता याच फेकाफेकीत फिरवला जात असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -